इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा अॅड.शुभम निंबाळकर
आय मिरर
इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान अध्यक्ष अॅड.शुभम तानाजी निंबाळकर यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गट व अजित पवार असे दोन गट झाल्यानंतर अजित पवार गटाकडून शुभम निंबाळकर यांची जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ,नवनाथ रुपनवर,संदेश देवकर,सचिन खामगळ,तानाजी पाटील,सुभाष पाटील,सचिन काळे, सौरभ कदम यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
अॅड. शुभम निंबाळकर यांनी विद्यार्थी तालुकाध्यक्ष तसेच युवक तालुका अध्यक्ष तसेच बारामती लोकसभा युवक अध्यक्ष पदावर देखील याआधी काम केले आहे. अनेक सामाजिक राजकीय विषयांवर आंदोलने, सामाजिक कार्यक्रम घेण्यात ते अग्रेसर असतात.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिला पवार,माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकूले, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डी. एन. जगताप,जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ,नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष विस्तारसाठी पुढील काळात काम करणार असल्याचे अॅड.निंबाळकर यांनी सांगितले.पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास टाकल्याबद्दल पक्षनेतृत्वाचे त्यांनी आभार मानले आहेत.
What's Your Reaction?