इंदापूर आयएमए कडून राबवण्यात येतेय 'खेड्याकडे चला' अभियान, पंधारवाडी गांव दत्तक
आय मिरर
पुण्याच्या इंदापूरात इंडियन मेडिकल असोशिएशन कडून "खेड्याकडे चला" हे अभियान राबवले जात असून या अंतर्गत पंधारवाडी गांव दत्तक घेण्यात आलेय.राज्याचे अध्यक्ष रविंद्र कुटे यांनी शनिवारी दि.३० सप्टेंबर रोजी इंदापूरातील पंधारवाडीला भेट दिली असता गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने हलगीच्या निनादात पाहुण्यांच स्वागत करत त्यांची ट्रॅक्टर मधून वरात काढली आहे.यावेळी डाॅ.रविंद्र कुटे यांनी पंधारवाडी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले आहे.दरम्यान इंदापूरच्या अध्यक्षा डाॅ.कल्पना खाडे यांनी ही गावकऱ्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या कामकाजाविषयी आणि ध्येय धोरणांविषयी मार्गदर्शन केले.
खेड्यातील लोकांचे आरोग्य उंचावण्यासाठी इंडियन मेडिकल असोशिएशन यावर्षी खेड्याकडे चला हा उपक्रम राबवत असून त्याला राज्यातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्तिया रविंद्र कुटे यांनी इंदापूरात दिली.
इंदापूरातील डाॅ.नितु मांडके सभागृहात आय.एम.ए. चा कार्यक्रम पार पडला असून राज्याचे अध्यक्ष डाॅ.रविंद्र कुटे, माजी अध्यक्ष डाॅ.राम आरणकर,इंदापूर शाखेच्या अध्यक्षा डाॅ.कल्पना खाडे,सचिव डाॅ.प्रतिभा वणवे यांसह इंदापूर आय.एम.ए.चे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
कुटे म्हणाले की,इंडियन मेडिकल असोशिएशन ही अँलोपॅथी डाॅक्टरांची सर्वात मोठी अशासकिय संस्था आहे.राष्ट्रीय स्तरावर साडेचार लाख सदस्य असून १ हजार ७०० शाखा आहेत.तर राज्यार पन्नास हजार सदस्य असून २४५ शाखा आहेत.यातून आम्ही सामाजिक दायीत्वाचा प्रचार आणि प्रसार करीत आहोत.
शरद अग्रवाल हे येऊ शकले नाहीत मात्र त्यांनी इंदापूर तालुक्यात इंडियन मेडिकल असोशिएशनचे काम कसे चालले आहे याचा आँनलाइन आढावा घेतला आहे.आवो गांव चलो चे चेअरमन बिपीनभाई पटेल,व्हा.चेअरमन अनिल पाचनेकर यांनी ही मार्गदर्शन केले आहे.राज्याचे माजी अध्यक्ष डाॅ.राम आरणकर,इंदापूरच्या अध्यक्षा डाॅ.कल्पना खाडे व त्यांच्या सहका-यांनी पंधारवाडी हे गमव दत्तक घेतले आहे.गेल्या सहा महिन्यात त्या ठिकाणी भेटी देऊन लोकांशी संवाद साधला आहे.सर्वांगिण आरोग्याच्या दृष्टीने आराखडा आखला आहे.अँनिमिया मुक्त अभियान,मुलींसाठी मासीक पाळीत घ्यावयाची काळजी,महिलांसाठी ब्रेस्ट कँन्सर,सर्वाइकल कँन्सर याचा अटकाव कसा करता येईल यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
केवळ कार्यक्रम घेतले जात नाहीत तर इंदापूर इंडियन मेडिकल असोशिएशन शाखेने ५० रुग्णांची मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मोफत करुन देऊन त्यांना दृष्टी उपलब्द करुन दिली आहे.व्यसनमुक्तीसाठी ही इंदापूर शाखा ही प्रयत्नशील आहे.
रक्तदान,मधुमेह,दमा,संधीवात,कर्करोग अशा आजाराविषयी जनजागृती करणं,रुग्णांची तपासणी करुन प्राथमिक अवस्थेत त्यांना इलाज करणे हे महत्वपूर्ण काम इंदापूर शाखा आज करत आहे.आजार होऊन बरा करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी मार्गदर्शन करणे फार महत्वाचे आहे.खेड्यातील लोकांना समजावून सांगणे आणि त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी इंदापूर शाखा गेले सहा ते सात महिने कार्यरत आहे पुढेही कार्यरत राहिल आणि त्यांच्या आरोग्याशी बांधिलकी ठेवेल असे म्हणत त्यांनी इंदापुरच्या शाखेचे कौतुक केले.
What's Your Reaction?