गुजरात मध्ये खरेदी केली अन् विमानाने पुण्यात आनली, वाचा का रंगली धुमाळांच्या अडीच लाखांची गाईची चर्चा
आय मिरर
गेली काही दिवसांपासून बैलगाडा शर्यती सुरु झाल्यानंतर बैलांना लाखो रुपयांची किंमत मिळत असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे.
आता पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क गुजरातमधून अडीच लाख रुपयांना गाय खरेदी करुन विमानाने आणली आहे. या गायची पुणे जिल्ह्यात चर्चा रंगू लागली आहे. ही गीर जातीची गाय सर्वाधिक दूध देणारी आहे.
पिंपळे खालसा येथील रवींद्र शांताराम धुमाळ या शेतकऱ्याला गोरक्षणाची आवड असल्याने त्यांच्याकडे यापूर्वी अनेक गाय आहेत. त्यांना गोरक्षणाची आवड असल्याने अनेक ठिकाणच्या शेतकरी तसेच गोशाळेंशी त्यांचा चांगला संपर्क आले,नुकतेच गुजरातमधील एकाकडे सुवर्ण गिर जातीची गाय आहे. ही गाय एकावेळी पंधरा लिटर दूध देत असून ही गाय विक्रीसाठी असल्याची माहिती रवींद्र धुमाळ यांना मित्राकडून समजली.
यावेळी मित्राने धुमाळ यांना गायीचे फोटो देखील पाठवले. फोटो पाहताक्षणीच धुमाळ यांना गाय आवडल्याने त्यांनी थेट गुजरात गाठले, गाय खरेदी करण्यासाठी त्यांनी गायसाठी थेट अडीच लाख रुपये देऊ करीत गाय विमानाने लोहगाव विमानतळ येथे आणून खासगी वाहनाने गायीला घरी आणले. ही गाय घरी येताच अनेकांनी गाय पाहण्यासाठी गर्दी केली.
What's Your Reaction?