आजपासून उजनीतून भीमा पात्रात पिण्याच्या पाण्याचं आवर्तन सोडणार ; सोलापूरकरांसह भीमा नदीकाठच्या गावांना दिलासा

Apr 8, 2025 - 07:48
 0  193
आजपासून उजनीतून भीमा पात्रात पिण्याच्या पाण्याचं आवर्तन सोडणार ; सोलापूरकरांसह भीमा नदीकाठच्या गावांना दिलासा

आय मिरर 

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. उजनी धरणातून आज पासून सोलापूरकरांसाठी भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर शहरासह पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगरपरिषद आणि भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी हे आवर्तन आजपासून सोडलं जाणार आहे.

आज सकाळी नऊ वाजल्यापासून 1600 क्युसेक इतका विसर्ग उजनीतून भीमा नदी पात्रात सोडला जाणार आहे. हळूहळू त्यामध्ये वाढ करून तो 6000 क्युसेक इतका केला जाणार आहे.

उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी इतकी असून आजच्या घडीला उजनी धरण केवळ 19 टक्के प्लस मध्ये आहे. उजनीत केवळ 10 पूर्णांक 19 टीएमसी इतका जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात उजनी धरण हे मायनस मध्ये जाईल.

सद्या उजनी धरणातून सीना-माढा योजना 333 क्युसेक, दहिगाव 120 क्युसेक, बोगदा 800 क्युसेक व मुख्य कालवा 2950 क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. 

उजनीची आजची स्थिती

एकुण पाणीपातळी 2091.29 दशलक्ष घन मिटर

उपयुक्त पाणीपातळी 288.48 दशलक्ष घन मिटर

एकुण पाणीसाठा 73.84 टीएमसी 

उपयुक्त पाणीसाठा 10.19 टीएमसी

धरणात उपयुक्त पाणीसाठा 19.01 टक्के

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow