गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर इंदापूर पोलीस ठाण्यात पार पडली महत्वपूर्ण बैठक ; या आहेत सूचना 

Sep 26, 2023 - 20:47
 0  1144
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर इंदापूर पोलीस ठाण्यात पार पडली महत्वपूर्ण बैठक ; या आहेत सूचना 

आय मिरर

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर इंदापूर पोलीसांकडून काही मार्गदर्शन सूचना पारीत करण्यात आल्या असून इंदापूर पोलीस ठाण्यात उपविभागी पोलीस अधिकारी श्रीकांत पाडुळे यांचे उपस्थित मंगळवार दि.२६ सप्टेंबर रोजी दुपारी इंदापूर शहरातील सर्व गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांची बैठक पार पडली आहे.या बैठकीत इंदापूर पोलीसांनकडून गणेश विसर्जन संदर्भात महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आल्याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

विसर्जन मिरवणुका दरम्यान गणेशोत्सव मंडळांना क्रमांक व वेळ निश्चित करून दिला जाईल.दिलेल्या क्रमांकाप्रमाणे गणेश मंडळे ही मिरवणूक मार्गावर रांगेने लागतील. डॉल्बी विरहित मिरवणूक असतील. नेहरू चौकात प्रत्येक मंडळांसाठी फक्त दोनच गाणी वाजवता येतील. शिवाय दर्गा मस्जिद चौक, भिसे चौक येथून पुढे येणा-या मंडळांना क्रम निश्चित करून दिला जाईल.पुढील काळात मिरवणूक काळात व श्रींच्या मूर्तीचे पावित्र जपण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळांनी सदस्य नेमुन द्यावेत. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  

तसेच मिरवणूक मार्गात येणाऱ्या अडी अडचणी बाबत चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले असून इंदापूर कगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे आणि महावितरण इंदापूर यांसोबत खडकपुरा,मुख्य बाजारपेठ , नेहरू चौक,दर्गा मज्जीद चौक या विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी देखील पोलीसांनी केली आहे. विसर्जन मार्गावर विजेच्या तारा,केबल, खड्डे यांचा अडथळा होणार नाही याबात सूचना दिलेल्या आहेत. 

पुणे सोलापूरच्या सिमारेषेवर तरडगांव येथे ही विसर्जन घाट तयार करण्यात आला असून पोलीसांनी या ठिकाणी पाहणी केली आहे. तरडगाव,हिंगणगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक,सरपंच यांना विसर्जन घाट ठिकाणी विद्युत व्यवस्था,लाऊडस्पीकर व्यवस्था,बॅरिकेडस व्यवस्था पट्टीचे पोहणारे,रोप, होडी आदी बाबी उपलब्ध ठेवण्यात यावेत याबत सूचना दिलेल्या असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

   

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow