Pimpri Chinchwad फक्त सिगारेट मागितली होती, 26 वर्षे तरुणाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक ! जागीच मृत्यू

Jun 2, 2025 - 08:15
Jun 2, 2025 - 08:19
 0  803
Pimpri Chinchwad फक्त सिगारेट मागितली होती, 26 वर्षे तरुणाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक ! जागीच मृत्यू

आय मिरर 

पिंपरी चिंचवड शहर एका धक्कादायक घटनेने हादरले आहे.पिंपरी चिंचवड शहरातील विठ्ठलनगर भागात सिगारेट मागितली म्हणून एका 26 वर्षीय तरुणाची सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून हत्या करण्यात आलीय,अक्षय संजय ठोके असं हत्या झालेल्या 26 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सकाळी 7 च्या दरम्यान दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवड मधील विठ्ठल नगर येथील साई कृपा हौसिंग सोसायटीच्या पार्किंग मध्ये ही घटना घडली आहे.

या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी आरोपी विश्वास भीमा शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103 नुसार गुन्हा दाखल केला असल्याची ही माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि मयत यांच्या सिगारेट मागण्यावरून वाद झाले होते. याच वादातून मयत अक्षय ठोके याने आरोपी विश्वास शिंदे याला सिमेंट चा ब्लॉक फेकून मारला तो वार आरोपीने चुकविला.

मात्र राग अनावर न झाल्याने विश्वास शिंदे याने चार ते पाच वेळा मयत अक्षयच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घातला यात त्याचा मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow