रोटरी इंटरनॅशनलकडून वसंतराव मालुंजकर बेस्ट डायरेक्टर गोल्ड पुरस्काराने सन्मानित

Jul 31, 2024 - 11:29
 0  226
रोटरी इंटरनॅशनलकडून वसंतराव मालुंजकर बेस्ट डायरेक्टर गोल्ड पुरस्काराने सन्मानित

आय मिरर

रोटरी इंटरनॅशनल अंतर्गत रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे माजी अध्यक्ष व मागील तेरा वर्षांपासून रोटरी क्लब मध्ये सक्रियपणे कार्य करणारे, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे व्हेकेशनल डायरेक्टर, रोटेरियन वसंतराव मालुंजकर यांना रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 वर्ष 2023- 24 या वर्षभरातील केलेल्या कार्याची दखल घेवून, पुणे येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके यांच्या हस्ते बेस्ट डायरेक्टर गोल्ड पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. 

पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील नामवंत व ज्यांच्यामुळे समाजात चांगला बदल घडतो आणि ज्यांच्यामुळे जनसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचविण्यास मदत होते. अशा शेकडो नामवंत व्यक्तीमत्वांची निवड करून, त्यांना मागील वर्षभरात रोटरी इंटरनॅशनल कडून, डिस्ट्रिक्ट 3131 च्या वतीने, वसंतराव मालुंजकर यांनी प्रांतपाल मंजू फडके यांच्या मार्गदर्शनाखाली व्हेकेशनल पुरस्काराने गौरविले होते. 

यामध्ये कला, क्रीडा, साहित्य, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व्यवसाय, व्यापार, आरोग्य, सामाजिक सेवा, वैद्यकीय, प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, कला, विज्ञान, वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान, समाजकल्याण, पर्यटन, महिला सबलीकरण, निमशासकीय, शासकीय व खाजगी संस्था, आदी क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना आणखी चांगले काम करण्यासाठी रोटरीच्या वतीने गौरविण्यात आले होते. त्यामुळे रोटरीची सर्व स्तरात मान उंचाविली आहे. 

मालुंजकर यांच्यावर सर्व स्तरातुन शुभेच्छांचा वर्षाव 

इंदापूर सारख्या ग्रामीण भागातून, रोटरी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेवर जावून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वसंतराव मालुंजकर यांचा तालुक्याला अभिमान आहे. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर, संस्थापक उपाध्यक्ष मुकुंद शहा, इंदापूर रोटरीचे नूतन अध्यक्ष मोरेश्वर कोकरे, रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलचे अध्यक्ष ज्ञानदेव डोंबाळे व सर्व संचालक यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व स्तरातून मालुंजकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow