शरद पवारांची बदनामी करून स्वतःला मोठे होता येणार नाही - शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंनी राज यांना सुनावलं
आय मिरर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांवर मनसेचे प्रमुख व राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी राज ठाकरे यांचा कडवट समाचार घेतलाय.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जेम्स लेन चा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वरती जातीयवादाचा आरोप केला आणि अजित पवारांना जातीयवादी नाहीत असं सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाच्या मुद्द्यावर काही भाष्य केली हे पाहता ते बाळबोध स्वरूपाचे बोलत होते अशी टीका विकास लवांडे यांनी केले आहे.
तुम्ही जेम्स लेन बद्दल बोलता जेम्स लेन तुमचा लाडका दिसतोय, जेम्स लेन ने जी जिजाऊँ बद्दल वक्तव्य केली राज ठाकरे तुम्हाला ती वाचायला मिळाली नाहीत का? आणि वाचली असतील तर तुम्हाला ती मान्य आहेत का ? जेम्स लेन ने जिजाऊंचा अवमान करण हे तुम्हाला मान्य आहे का ?याचे उत्तर तुम्ही दिले पाहिजे असं लवांडे म्हणाले आहेत.
समाजशास्त्र किंवा या देशाचा महाराष्ट्राचा जातीसंस्थेचा इतिहास त्यांना माहीत नसावा. चातुर्वर्ण व्यवस्थेचा समर्थक या देशात आणि राज्यात कोण आहे राज ठाकरेंनी जरा माहिती करून घ्यावी. प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके यासंदर्भातील आहेत ती आपण जरा वाचून बघावीत आणि त्यानंतर शरद पवारांवर आरोप करावेत असे खडे बोल विकास लवांडे यांनी सुनावले आहेत.
शरद पवारांची बदनामी करून स्वतःला मोठे होता येणार नाही……
शरद पवार यांनी कधीही कुठलीही जातीयवादाची भूमिका घेतल्याचा पुरावा द्यावा. कधी जातीय मेळावा. घेतल्याचा पुरावा द्यावा मणिपूर सारखी घटना घडू शकेल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली, असं शरद पवार बोललेले असताना मणिपूर घडेल आणि त्यावर आपण उलट सुलट वक्तव्य करता ही फेकाफेकी करण्याचे बंद करा. शरद पवारांची बदनामी करून स्वतःला मोठे होता येणार नाही. त्यासाठी स्वतःची रेषा मोठी करा.
या महाराष्ट्रात जेव्हा मंडळ आयोगाची अंमलबजावणी जेव्हा शरद पवारांनी केली, आणि ओबीसींना आरक्षण मिळालं तेव्हा काँग्रेसला ओबीसी समाज आता साथ देईल पुढच्या काळात राजकीय पाठबळ देईल अशी भीती तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वाटली, 1995 साली भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन लोकांनी माळी धनगर वंजारी असा माधव नावाचा फॉर्मुला काढला आणि जातीची मिळावे घ्यायला सुरुवात केली. त्याची परंपरा आजही मराठवाड्यात सुरू आहे. आता भगवान गडावर मिळावे त्याच्या अगोदर नारायण गडावर मिळावे होत होते. हे ओबीसीचे मिळावे किंवा माधवचे मिळावे कोण घेत होतं? राज ठाकरेंनी हे तपासून बघावं.
आपण आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलला आरक्षणा बद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही. आरक्षण सामाजिक न्याय, समता बंधुता न्याय याच्यावर एखादी सभा आपण कधीतरी घ्यावी असंही लवांडे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दौरा सुरू केला आहे कधी नव्हे तर त्यांना मध्ये मध्ये असे पर्यटन करावं लागतं. राज ठाकरे यांनी सोलापूर मधून दोन-तीन विधान केली त्यानंतर मराठवाड्यात त्यांना अक्षरशः बंदी घातल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. परभणी मधील नियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द केलं आणि थेट छत्रपती संभाजीनगर गाठलं असंही लवांडे यांनी म्हटलं आहे.
What's Your Reaction?