मोठी बातमी | प्रवीण मानेंनी व्यक्त केली आमदार होण्याची इच्छा
आय मिरर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूरचे युवा नेते प्रवीण माने यांनी आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रवीण माने यांनी आपल्या इंदापूर मधील निवासस्थानी आज शनिवारी 10 आँगस्ट रोजी सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त पत्रकार परिषद घेतली,यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मलाही आमदार व्हाव असं वाटतं अशी प्रतिक्रिया प्रवीण माने यांनी दिली आहे.
पुढे बोलताना प्रवीण माने म्हणाले, बळीराजा संकटात आहे महाराष्ट्रावर मोठं संकट ओढावलेय या संकटातून बाहेर पडायचं असेल तर पवार साहेबांशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राला न्याय देणारा आणि महाराष्ट्राच्या मदतीला धावून येणारा माणूस म्हणजे पवार साहेब. त्यांच्या विचाराचं सरकार येणं गरजेचं आहे तर बळीराजाचं सरकार येईल असं आम्हाला वाटतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने 23 ऑगस्ट 2024 रोजी इंदापूर शहरातील वाघ पॅलेसच्या मैदानात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सोहळ्याला बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांसह बडे नेते उपस्थित राहणार असल्याचेही प्रवीण माने यांनी सांगितले आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यात 51 जोडपी विवाहबद्ध होणार असून सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना मनी मंगळसूत्रापासून इतर संसार उपयोगी सर्व साहित्य दिल जाणार आहे आज यातील काही साहित्याचं वितरणही प्रवीण माने यांनी केले आहे.
तर इंदापुरात होणार तिरंगी लढत…
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे तिसऱ्यांदा इंदापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील दोन दिवसापूर्वीच प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत महायुतीच्या जागा वाटपात सिटिंग जागा त्या त्या पक्षाला मिळतील असं विधान केल्यानं.आमदार भरणे यांच्या उमेदवारीचा मार्ग काहीसा सुखर झाला आहे. तर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी 2024 ची इंदापूर विधानसभेची निवडणूक ही "इंदापूर तालुका विकास आघाडी" मधून अपक्ष लढवावी असा घाट हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी घातला आहे.इंदापूर तालुक्यात एक ऑगस्ट पासून तालुका विकास आघाडीच्या शाखा गावोगावी स्थापन करण्यास देखील सुरुवात झाल्याने उद्याची इंदापूरची निवडणूक ही दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातच होणार हे निश्चित मानलं जात आहे.आता प्रवीण माने यांनी आपल्याला आमदार होण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे पवार गटाकडून प्रवीण माने निवडणूक लढवतील का आप्पासाहेब जगदाळे यांची उमेदवारी निश्चित केली जाईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
What's Your Reaction?