हजरत पैगंबर जयंती निमित्त तेजपृथ्वी ग्रुपने दिला एकतेचा संदेश 

Sep 30, 2023 - 18:41
 0  140
हजरत पैगंबर जयंती निमित्त तेजपृथ्वी ग्रुपने दिला एकतेचा संदेश 

आय मिरर

हजरत पैगंबर जयंती निमीत्त आज खडकपुरा इंदापूर शहर येथे तेजपृथ्वी ग्रुप कडून सर्व मुस्लिम बांधवांना मिठाई व पाणी वाटप करून शुभेच्छा देत एकतेचा संदेश दिला.यावेळी तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता खरात व तेजपृथ्वी ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अनिता खरात म्हणाल्या की आपण सर्व बहिण भाऊ आहोत.जात धर्म या पलीकडे जाऊन माणुसकी आणि माणूस हाच आमच्यासाठी जात धर्म आहे. सर्व सण उत्सव एकत्र करणे काळाची गरज आहे.आपण जेव्हा अडचणीत असतो त्यावेळी जो आपल्याजवळ प्रथम येतो तोच आपल्यासाठी आपला संकट मोचक असतो मग त्यावेळेस आपण जात धर्म बघत नसेल तर इतर वेळी ही जात धर्म न बघता आपण सर्व या भारत मातेची लेकरं आहोत या भावनेने राहिले पाहिजे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow