निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात कोसळलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू ! दोघांचेही मृतदेह शोधण्यात यश
आय मिरर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काझड येथे निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात इंदापूर तालुक्यातील दोन शेतकरी कोसळल्याची धक्कादायक घटना काल रात्री उशीरा घडली होती.या दोघांचा ही रात्री उशीरापर्यंत शोध सुरु होता.अखेर रात्री साडेअकरा पावणेबारा च्या सुमारास या दोघांचेही मृतदेह शोधण्यात स्थानिक नागरिकांसह प्रशासनाला यश आले आहे. अनिल बापूराव नरूटे आणि रतिलाल बलभीम नरुटे अशी या दोन शेतकऱ्यांची नावे असून ते इंदापूर तालुक्यातील काझड येथील सिध्देश्वर वस्ती येथील रहिवासी आहेत.
मराठवाड्याच्या सात टीएमसी पाण्यासाठी सुरू असलेल्या कृष्णा जलस्थिरीकरणाच्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या बोगद्यात पडून ही दुर्दैवी घटना घडली आहे.काझड गावचे हद्दीत नदी जोड प्रकल्प अंतर्गत चालू असलेल्या बोगद्याचे कामाचे ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने हे दोघे खाली उतरत होते. यावेळी क्रेन तुटली आणि रतिलाल नरुटे वय अंदाजे 50 वर्षे व अनिल नरूटे वय अंदाजे 32 वर्षे हे दोघेही बोगद्यामध्ये कोसळले गेले.हे दोघेही साधारण 250 ते 300 फूट खोल कोसळले गेले होते.यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान घटना समजताच आमदार दत्तात्रय भरणे यांनी देखील या प्रकरणी बचावासाठी सर्व ती यंत्रणा उललब्ध करुन देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. आमदार भरणे यांची पुतणे अनिकेत भरणे,सचिन सपकळ,विजय काळे यासह अनेक मंडळी या ठिकाणी या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न करत होती.तहसीलदार श्रीकांत पाटील यांसह वालचंदनगर पोलीस स्टेशन आणि भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. एका मोठ्या क्रेन च्या मदतीने काही माणसे या बोगद्यात उतरली गेली आणि त्या दोघांचा शोध घेतला गेला. मात्र त्यांना वाचवण्यात सर्वांनाच अपयश आले.
What's Your Reaction?