BIG BREAKING पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर नजीक खाजगी बसला अपघात
आय मिरर
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर खाजगी प्रवाशी बसला अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती आणि इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याची माहिती मिळतेय.
टायर फुटल्याने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने धडक दिली आणि ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूटरोडवरुन खाली जाऊन आदळली.या बस मध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही.मात्र या बसमधील 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झाले असून या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचार कमी दाखल केलयं. या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिस ठाण्याचे सुहास आरणे,अमोल खाडे,वंदना भोंग पद्मासिंह शिंदे यांसह एन एच ए आय चे पथक या ठिकाणी दाखल झाले होते.
MH 04 KF 5969 क्रमांकाची ही खाजगी बस होती. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मधून पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती अशी माहिती मिळत असून इंदापूर पासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती TN 93 B 3062 क्रमांकाचा मालवाहु ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला होता आणि बसचे टायर फुटल्याने या बसने या ट्रकला धडक दिली. या अपघातात ट्रक मधील असणारे लोखंड देखील रस्त्यावर विखुरलं गेलं. तर ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून थेट 25 फूट रोडच्या बाहेर जाऊन आदळली.
सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र बसचा आणि या खाजगी मालवाहू ट्रकच्या मोठ्या नुकसान झालाय. तर 10 ते 11 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इंदापूर पोलीसांनी महामार्गावर असणारा अपघात ग्रस्त ट्रक बाजूला घेत वाहतूक देखील सुरळीत केली आहे.
What's Your Reaction?