भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांची सातारला बदली ; अशी आहे कारकिर्द
आय मिरर(देवा राखुंडे)
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाणे आणि भिगवण पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारून या दोन्ही ठिकाणची यशस्वी जबाबदारी पार पाडणारे प्रभारी अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची खात्याअंतर्गत बदली झाली आहे. सध्या भिगवन पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पदभार होता.दिलीप पवार यांनी इंदापूर तालुक्यातील या दोन्ही पोलीस ठाण्यात मिळून जवळपास पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
हसतमुख चेहरा,मित्तभाषी आणि कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून दिलीप पवार यांची ओळख आहे. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर आणि भिगवण या दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केल्याने पोलीस खात्याकडून त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. एकंदरीत पाच वर्षाच्या कालखंडात या दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्हेगारी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते नावारूपाला आले आणि जनतेसोबत त्यांची एक विशेष नाळ देखील जोडली गेली होती.
कोण आहेत दिलीप गोविंद पवार ?
सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील एका खेड्यातील BSC (Agri), M.B.A ( Police Administration) असे उच्च शिक्षित असणारे दिलीप गोविंद पवार हे महाराष्ट्र पोलीस खात्यात २५ सप्टेंबर २०११ रोजी महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदी भरती झाले.दिनांक २५ आँक्टोंबर २०१२ ते दिनांक १३ मार्च २०१५ जिल्हा गडचिरोली (प्रभारी अधिकारी, उप पोस्टे. मालेवाडा), दिनांक १५ मार्च २०१५ ते दिनांक २६ मे २०१७ जिल्हा पुणे ग्रामीण (लोणीकाळभोर पोलीस स्टेशन) येथे सेवा बजावली.
पुढे सहा.पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली.दिनांक ३० मे २०१७ ते दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ फोर्स वन मुंबईत सेवा बजावली.दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ ते दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ रायगड ( स्थानिक गुन्हे शाखा ) आणि दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ ते दिनांक १२ जून २०१९ लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण उरूळी देवाची पोलीस दुरक्षेत्रात सेवा बजावली.
पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी कार्यकाळ : दिनांक १२ जून २०१९ ते दिनांक २० आँगस्ट २०२१ वालचंदनगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण सेवा बजावली. दिनांक २० आँगस्ट २०२१ रोजी पासुन ते आज रोजी पर्यंत भिगवण पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे कार्यरत होते.आता नुकतीच त्यांची सातारा जिल्ह्यात बदली झाली आहे.
या कालावधीत पवार यांच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला असून पोलीस खात्यामध्ये एकूण १३५ बक्षिसे मिळाली असून मागील आठ वर्षांमध्ये A+ नामांकन राहिले आहे.यासोबत पोलीस दलामध्ये केलेली विशेष कामगिरी व बक्षीसे ही त्यांच्या नावावर आहेत.
दिनांक २५ आँक्टोंवर २०१२ ते दिनांक १३ मार्च २०१५ रोजीचे कालावधीमध्ये गडचिरोली या नक्षत्रगस्त जिल्ह्यात बजाविलेल्या कठीण व खडतर कामगिरी बद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडुन अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांचे हस्ते "आंतरिक सुरक्षा सेवा पदक व विशेष सेवा पदक" या पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.माहे जानेवारी सन २०२९ मध्ये वालचंदनगर पोलीस स्टेशनचे हद्दीतील गंभीर गुन्हे उघडकीस आणुन सर्वोत्कृष्ठ कामगिरी केले बद्दल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे हस्ते सर्वोत्कृष्ठ प्रकटीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.माहे जानेवारी सन २०२२, मध्ये भिगवण पो स्टे गुन्हा रजि. नंबर ०३/२०२२ भादवि कलम ३०२, २०१ या गंभीर गुन्ह्याचा तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे हस्ते " बहिर्जी नाईक " या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.भिगवण पो.स्टे, गुन्हा रजि नंबर १९२/२०२३, भादवि कलम. ३०२, २०१ यागंभीर गुन्ह्याचा तपास करून सदरचा गुन्हा उपडकीस आणल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांचे हस्ते " प्रशंसनीय कामाबद्दल " सन्मानित करण्यात आले आहे.माहे सप्टेंबर सन २०२३ मध्ये भिगवण पोलीस स्टेशन येथे सर्वोत्तम कामगिरी केल्याने " सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन " प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे.तर पोलीस दलामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेबाबत " ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ इंडीया २०२३" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सहा.पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दि.२० आँगस्ट २०२१ रोजी भिगवण पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी पदभार स्विकारला त्यानंतर केलेल्या कामगिरीचा हा आढावा…
भिगवण पोलीस स्टेशन इमारत : वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत भिगवण पोलीस स्टेशन हे दुरक्षेत्र होते, सन २०१४ साली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे विभाजन होऊन सन २०१४ साली भिगवण पोलीस स्टेशनची स्थापना झाली. सन २०१४ साली भिगवण पोलीस स्टेशनची स्थापना झाल्यानंतर भिगवण पोलीस स्टेशन हे यापूर्वी भिगवण पोलीस दुरक्षेत्र हे छोट्या इमारतीमध्ये चालू झाले सदर ठिकाणी प्रशस्त इमारत नसल्यामुळे नागरीकांना तसेच पोलीसांना कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत होते.
दिनांक २० आँगस्ट २०२१ रोजी दिलीप पवार, सहा पो. निरीक्षक यांनी भिगवण पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणुन चार्ज घेतल्या नंतर सदरचे महत्वपुर्ण अडचणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून पोलीस स्टेशनला नविन इमारत व्हावी या हेतुने शासन स्तरावर पाठपुरावा करून तसेच वरीष्ठ कार्यालयासोबत पत्रव्यवहार करून भिगवण पोलीस स्टेशनची नविन इमारत बांधण्यासाठी १ कोटी ४१ लाख ३,६२२/- इतका निधी मंजूर करून घेवुन भिगवण पोलीस स्टेशनचे नविन इमारतीचे प्रशस्त बांधकाम चालु करून घेवुन सदरचे काम हे पुर्णत्वास आणले आहे.
पोलीस चौकीची स्थापना : भिगवण पोलीस स्टेशनचे हद्दीतील नागरीक, जेष्ठ नागरीक, महिला, तसेच रोडने जाणारे येणारे नागरीक यांना तात्काळ सेवा मिळावी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचावेत व तक्रारदार यांचे तकारीचे तात्काळ निरासण व्हावे या हेतुने एक प्रभावी पोलीसींग राबविता यावी या हेतूने डाळज नंबर २ गावामध्ये पुणे सोलापुर महामार्गालगत तसेच मौजे शेटफळगडे गावचे हद्दीत भिगवण बारामती रोड लगत चौकीची स्थापना करून सदर ठिकाणी चौकी तयार करून घेवुन पोलीस स्टाफची नेमणुक केली व नागरीकांना भेडसावणारे प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले.तसेच पुणे सोलापुर रोडवर बिल्ट कंपनी समोर वारंवार अपघात घडत असल्यामुळे तसेच बिल्ट
कंपनीचे जवळ चो-या घडत असल्यामुळे बिल्ट कंपनीचे अधिकारी यांचे सोबत चर्चा करून बिल्ट कंपनीचे समोर चौकी टाकून सदर ठिकाणी २४ तास सिक्युरीटी गार्डची नेमणुक करून सदर ठिकाणी होणा-या चो-या, अपघात यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले.
पोलीस अधीकारी व पोलीस जवान : भिगवण पोलीस स्टेशनने अधिकारी व पोलीस जवान यांचे मनामध्ये काम करण्याची प्रेरणा जागृत होवून अत्यंत चांगल्या प्रकारे काम करावे यासाठी वेळोवेळी पोलीस अधिकारी व पोलीस जवान यांचे शारिरीक तपासणी शिबीर आयोजीत केले, तसेच पोलीस अधीकारी व पोलीस जवान यांचे वाढदिवसाचे दिवशी पोलीस स्टेशनमध्ये वाढदिवस साजरा करणाप्याचा अभीनव उपक्रम चालू केला.
बीट मार्शल पेट्रोलींग व प्रभावी रात्रगस्त : भिगवण पोलीस स्टेशनचे हददीत हददीत जबरी चोरी, चोरी, दरोडा या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंध व्हावा या हेतुने पोलीस स्टेशनचे हद्दीत बीट मार्शलची नेमणुक करून तसेच रात्रीच्या वेळी पण गुन्ह्यांना आळा बसावा या हेतुने तीन वाहनांमधुन तीन टिम तयार करून पोलीस स्टेशनचे हद्दीत प्रभावी पणे पेट्रोलींग करून जबरी चोरी,चोरी, दरोडा गुन्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट करून गुन्ह्याना प्रभावी पणे आळा घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
मुद्देमाल हस्तगत : भिगवण पोलीस स्टेशनचे हद्दीतुन जबरी चोरी, चोरी, अशा गंभीर स्वरापाचे गुन्ह्यांचा तपास करून सदरने गुन्हे उघडकीस आणुन त्यामध्ये आरोपी यांना अटक करून आरोपी यांचेकडून एकुण ४४ लाख ३६०/- रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सायबर क्राईम : भिगवण पोलीस स्टेशनचे हद्दीत घडणारे सायबर क्राईमच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सोशल मिडीया व्दारे जनजागृती करून सोशन मिडीया व्दारे होणारे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले तसेच कॉलेज, शाळा यामध्ये कार्यशाळा घेवुन प्रसिध्दी केली. तसेच पोलीस स्टेशनने डिजीटल बोर्ड व्दारे जनजागृती करून सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये आळा घालण्याचा खूप मोठया प्रमाणामध्ये प्रयत्न केला.
सी.सी.टी.व्ही कॅमेरे : भिगवण पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये चोरी तसेच इतर गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा तसेच पोलीस स्टेशनचे हद्दीत कोणतिही घटना घडल्यास तात्काळ त्याचे पर्यंत पोहचता यावे या हेतूने पोलीस स्टेशनचे हद्दीत विशेष प्रयत्न करून नागरीकांना सी.सी.टी.व्ही कॅमे-यांचे महत्व पटवुन देवुन पोलीस स्टेशनचे हद्दीत एकुण १२० कॅमेरे बसविले आहे.
वाहतुक : भिगवण पोलीस स्टेशनचे हद्दीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या भिगवण, मदनवाडी, तकारवाडी परीसरातील रस्त्यांचा सर्व्हे करून बेशिस्त रित्या वाहने पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वाहनांवर कारवाई करून रस्ते सामान्य नागरीकांना खुले करून देण्यासाठी तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, या संक्लपनेतुन भिगवण, तकारवाडी, मदनवाडी परीसरामध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वाहन चालकाचे विरुध्द भारतीय दंड संहीता कलम २८३ प्रमाणे एकूण ३७६ गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली, तसेच दारू पिवुन वाहन चालविणारे लोकांचे विरूध्द मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे एकूण २५७ गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली.
पोलीस स्टेशनचे हद्दीत सुशोभिकरण : भिगवण पोलीस स्टेशनचे हददीतील अत्यंत महत्वाचा व प्रथमदर्शनी मौजे मदनवाडी गावचे हद्दीतील मदनवाडी चौक स्थानिक नागरीक यांना मदतीस घेऊन मदनवाडी चौकातील संपूर्ण अतिक्रमण काढून घेऊन चौकाचा एक प्रकारे श्वास मोकळा केला. त्यामुळे रोडने जाणारे येणारे नागरीक यांना कोणत्याही प्रकारे वाहतूकी अडथळा निर्माण होईल अशा रितीने अतिक्रमण ठेवले नाही. तसेच मदनवाडी चौकामध्ये पुणे सोलापुर रोडवर असणारे मुख्य उड्डाणपूलावर अतिशय चांगल्या प्रमाणे रंगरंगोटी करून समाजामध्ये चांगला संदेश जाईल या हेतुने बोध वाक्य टाकुन तसेच भिगवण, मदनवाडी, तक्रारवाडी या गावामध्ये असलेल्या उजनी धरणाचे बॅक वाॅटरमध्ये असणारे पक्षांचे चित्र काढून त्याचे अत्यंत चांगल्या प्रकारे सुशोभिकरण करून पर्यटन स्थळाप्रमाणे सुधारणा करून घेतली.
कॉलेज रोडरोमियोवर कारवाई : भिगवण पोलीस स्टेशनचे हद्दीतील कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी मुले आई, वडीलांकडून कॉलेजला जाण्यासाठी मोटार सायकली घेऊन सदर मोटार सायकल वरून भिगवण परीसरामध्ये गाड्यांचे हॉर्न वाजवुन, गाड्यांच्या पुंगळ्या काढून शाळेच्या तसेच मुख्य चौकामध्ये हुल्लडबाजी करीत फिरून शिक्षणा पासुन दुर जावुन एकमेकांचे सोबत भांडण तंटा करून सार्वजनिक शांततेना भंग करीत असतात. त्यामुळे त्यांचेवर वेळोवेळी बीट मार्शल तसेच निर्भया पथक तपास करून त्यांवर कारवाई केली. तसेच त्या माध्यमातुन कॉलेज, शाळा, मध्ये मुलांचे करीयर बाबत मार्गदर्शन करून त्यांना वाईट जाण्याचे मार्गपासुन परावृत्त करून शिक्षण देण्यासाठी प्रोस्ताहीत केले.
गुन्हे दोषसिध्दी : भिगवण पीलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सखोल तपास करून आरोपी यांविरुध्द गुन्ह्यामध्ये भरपुर व सबळ पुरावा गोळा करून दोषारोपत्र मा.न्यायालयामध्ये सादर करून सदरचे गुन्हे हे मा,न्यायालयाचे समोर चालवुन घेतले, यामध्ये मा. न्यायालयाने दाखल केलेल्या गुन्ह्याचे सरसरीमध्ये ९३ टक्के खटल्यामध्ये शिक्षा दिली आहे.
सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन ऑफ मंथ पुरस्कार : माहे सप्टेंबर सन २०२३ मध्ये भिगवण पोलीस स्टेशन मध्ये उत्कृष गुन्हे प्रकटीकरण, मुद्देमाल हस्तगत, पोलीस स्टेशन मधील रेकॉर्ड अद्यावत ठेवणे, प्रतिबंधक कारवाई करणे, गुन्ह्यांना आळा घालणे अशी सर्वोत्तम कामगिरी केल्याने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी भिगवण पोलीस स्टेशनला "सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन" प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे.
पोलीस कामगिरी विशेष पुरस्कार :
१) माहे जानेवारी सन २०२२ मध्ये भिगवण पो.स्टे.गुन्हा रजि.नंबर ०३/२०२२, भादवि कलम ३०२,२०१ या गंभीर गुन्ह्याचा तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे हस्ते "बहिर्जी नाईक" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
२)भिगवण पो.स्टे.गुन्हा रजि नंबर १९२/२०२३, भादवि कलम ३०२, २०१ यागंभीर गुन्ह्याचा तपास करून सदरचा गुन्हा उपडकीस आणल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांच्या हस्ते प्रशंसनीय कामाबददल सन्मानित करण्यात आले आहे.
३) पोलीस ठाण्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेबाबत "ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ इंडीया २०२३" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
What's Your Reaction?