शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून बावडा गावातील 101 ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी 

Jan 8, 2024 - 15:54
 0  177
शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून बावडा गावातील 101 ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी 

आय मिरर

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर कडून सोमवार दि.०८ जानेवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास बावडा गावातील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्मा भोसले यांच्या शेतात ऊसतोड करणा-या १०१ ऊस तोड मजूरांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती प्राथमिक केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण यांनी दिली.

यावेळी अर्जुन नामदेव गायकवाड,शिवदास शंकर करे, प्रकाश काळे ,दादासाहेब कांबळे, दादा जानकर, केंद्राच्या डॉक्टर सारंगी कुंभार,नर्स दिव्या कुमरे, दिव्या लांडे, वॉर्ड बॉय नितेश बेटेकर आणि केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण उपस्थित होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow