जालना घटनेच्या निषेधार्थ इंदापुरातील शिरसटवाडीत उद्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Sep 6, 2023 - 19:03
Sep 6, 2023 - 20:32
 0  715
जालना घटनेच्या निषेधार्थ इंदापुरातील शिरसटवाडीत उद्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

आय मिरर

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांसह अनेक समाज बांधव उपोषणाला बसले होते. दरम्यान या आंदोलकांवर पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला. त्यानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत.

राज्यात विविध स्तरातून याचा निषेध नोंदवला जात असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडी गावातील ग्रामस्थ आणि सकल मराठा समाज या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि मराठा बांधवांच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे.

शिरसटवाडी गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत शिसटवाडी गावचे ग्रामस्थ व सकल मराठा समाज बांधव एकत्र येत हे एक दिवसीय लाक्षणिक अपोषण करणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow