चोरलेलं सोनं विक्री करण्यापूर्वीच यवत पोलिसांच्या हाती लागले अन् 14 घरफोड्या उघड झाल्या...

Feb 10, 2025 - 15:51
Feb 10, 2025 - 16:15
 0  1561
चोरलेलं सोनं विक्री करण्यापूर्वीच यवत पोलिसांच्या हाती लागले अन् 14 घरफोड्या उघड झाल्या...

आय मिरर 

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत तब्बल 14 घरफोड्या करून दहशत माजवणाऱ्या अट्टल टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि यवत पोलिसांनी जेलबंद केलंय.. रोहित उर्फ पिल्या प्रवीण पवार, नितीन सुखराज भोसले,रोहित राजेश काळे आणि आयश्याम विलास भोसले अशी आरोपींची नावे आहेत.त्यांच्याकडून तब्बल 12 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत उत्तम शंकर नेवसे यांच्या घरामध्ये आज्ञातांनी घुसून कोयत्याचा धाक दाखवत 30 हजार रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यवत पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्हीचा आधार घेत यातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यातील आरोपी सोने विक्रीकरिता भांडगाव या ठिकाणी येणार असल्याची पोलिसांना गुप्त माहिती खाबऱ्या करून मिळाली होती. त्यावर पोलिसांनी सापळा रचून यातील आरोपींना ताब्यात घेतले.

या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी तब्बल 14 ठिकाणी घरफोडी जबरी चोरी यासारख्या गंभीर घटना केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 120 ग्रॅम सोन्याचे दागिने 15 भार चांदी,तीस हजार रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा तब्बल 12 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने,पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख,किशोर वाघज,राहुल गावडे,पोलीस हवालदार संदीप देवकर,गुरुनाथ गायकवाड,अक्षय यादव,विकास कापरे,महेंद्र चांदणे, रामदास जगताप, सुभाष शिंदे, सचिन घाडगे,अजित भुजबळ,विजय कांचन, पोलीस शिपाई धीरज जाधव, मारुती बाराते,अमोल भुजबळ आणि मोहन भानवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow