Rajwardhan Patil वडिलांसमोरच मुलाला फुटला अश्रूंचा बांध ! वाचा निराभिमाच्या वार्षिक सभेत काय घडलं

Sep 23, 2024 - 16:36
Sep 23, 2024 - 16:36
 0  2813
Rajwardhan Patil वडिलांसमोरच मुलाला फुटला अश्रूंचा बांध ! वाचा निराभिमाच्या वार्षिक सभेत काय घडलं

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली आणि या सभेमध्ये कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांना अश्रू अनावर झालेत. यावेळी मंचावर हर्षवर्धन पाटील देखील उपस्थित होते.

आपले वडील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यासाठी जे विकास काम केलं निराभिमा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो न्याय दिला ही भूमिका सभासद शेतकऱ्यांना समजावून सांगताना राजवर्धन पाटलांना अश्रू अनावर झाले आहेत.

गेल्या दहा वर्षापासून भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे राजकारणाच्या बाहेर आहेत. दोन वेळा त्यांचा पराभव झालेला आहे. राजकीय सत्तेपासून हर्षवर्धन पाटील दूर आहेत मात्र हर्षवर्धन पाटलांकडून सुरू असणारी विकास काम थांबली नाहीत. आता तिसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत सत्तेपासून दूर असले तरी हर्षवर्धन पाटील हे सामान्य लोकांपासून कधीच दूर गेले नाहीत आणि त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा हिताचा चालू ठेवला. अनेक वेळा हर्षवर्धन पाटील यांच्या वरती राजकीय टीकाटिपने झाली राजवर्धन पाटील यांनी ती डोळ्यांनी पाहिली ऐकली. मात्र या सर्व टीका टिप्पणीला कानामागे टाकीत आपला बाप रात्रंदिवस सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी झटतो ना कधी तो थांबला ना कधी थांबेल या सर्व व्यथा मांडताना आज अक्षरशा राजवर्धन पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ऐकणारे स्तब्ध झाले.

राजवर्धन पाटील म्हणाले,टीका करणे सोपे असतं त्याग करावा लागतो,वेदना होतात तरी आम्ही खचून गेलेलो नाही.. खचून जाणार नाही आम्ही चुकीचे वागलो नाही..वागणार नाही.भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत. सध्या भाऊंना जनतेसाठी अहोरात्र काम करताना, संस्था चालवताना किती त्रास होतो, त्याग करावा लागतो, वेदना होतात हे मी जवळून पाहत आहे.खरं सांगतोय.. तुमच्यासाठी संस्थांसाठी कष्ट, सर्व त्रास भाऊ सहन करीत आहेत... हे सगळं तुमच्यासाठी चालले आहे. मोठे भाऊ, हर्षवर्धनभाऊ, घोलप साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जात आहोत. भाऊंच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे रहा, विचारांना महत्त्व आहे, इंदापूर तालुक्यामध्ये भाऊंचे नेतृत्वाखाली राजकारण, समाजकारण करीत असलेले बावड्याचे पाटील घराणे तुमच्यासाठी टिकले पाहिजे, असे भावनिक आवाहनही राजवर्धन पाटील यांनी भाषणात केले. 

युवा पिढीचे नेतृत्व करीत असलेल्या राजवर्धन पाटील यांच्या करारी परंतु तेवढ्याच प्रेमळ स्वभावाची अनुभूती आजच्या भाषणाने उपस्थित हजारो सभासद, शेतकरी, कामगार, हितचिंतक यांना आली. तसेच राजवर्धन पाटील यांच्या विकासाच्या दूरदृष्टीची व वैचारिक विचारसरणीची जाणीव आज अनेकांना झाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow