माझ्याकडं बॉम्ब आहे, सगळ उडवून देईल ! सातारच्या विश्रामगृहात नेमकं काय घडलं वाचा सविस्तर… 

Dec 6, 2024 - 16:53
Dec 6, 2024 - 16:56
 0  384
माझ्याकडं बॉम्ब आहे, सगळ उडवून देईल ! सातारच्या विश्रामगृहात नेमकं काय घडलं वाचा सविस्तर… 

आय मिरर

मानसिक विकलांगाने केला आरडाओरडा, कर्मचाऱ्यांना फुटला घाम, काही वेळात पोलिसांचा फौज फाटा बॉम्ब तपासणी पथक अग्निशामक दल विश्रामगृहावर दाखल झाला.हे सर्व घडलं सातारा शासकीय विश्रामगृहाबाहेर.

घडलं असं की,शासकीय विश्राम गृहाबाहेरील एक व्यक्ती फिरत होता. माझ्याजवळ बॉम्ब आहे म्हणत तो इकडे तिकडे पळू लागला. इतक्यात शासकीय विश्रामगृहाच्या गेटमधून तो आत जाताच माझ्याकडे बॉम्ब आहे आरडीएक्स आहे मी आत्ता सगळं उडवून देणार आहे. हे ऐकून विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांना धडकी भरली त्यांनी थेट 112 क्रमांक डायल करून एक इसम बॉम्ब घेऊन घुसल्याची माहिती दिली ही माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

अवघ्या काही सेकंदात बॉम्ब तपासणी पथक ही घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी त्या इस्माला ताब्यात घेत चौकशी केली असता तो मानसिक विकलांग असल्याचे दिसून आले.

टाकेवाडी तालुका मान येथील रहिवासी शिवाजी विनायक दडस हा गुरुवारी दुपारी सातारा शासकीय विश्रामगृहाबाहेर फिरत होता. फिरता फिरता तो जोरात पळून माझ्याजवळ बॉम्ब आहे असे म्हणू लागला. येणारे जाणारे वाहनधारक त्याला बघत होते पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते इतक्यात तो शासकीय विश्रामगृहाच्या गेटमधून आत गेला यावेळी रेस्ट हाऊस मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य बाहेर जाण्यासाठी निघाल्या त्यांना पाहून तो माझ्याकडे बॉम्ब आरडीएक्स आहे मी आता सगळं उडवून देणार आहे मी एका महिलेचा खूनही करणार आहे असे म्हणत दंगा करू लागला. 

हे ऐकून महिला घाबरल्या त्यांनी तात्काळ इतर सदस्यांना बोलावले त्यांना पाहून शिवाजी आत घुसण्याचा प्रयत्न करू लागल्याने सर्वांना धडकी भरली. त्यांनी क्षणाचा विलंब न करता 112 क्रमांक डायल करून एक इसम बॉम्ब घेऊन घुसला असून विश्रामगृह उडवून देण्याची धमकी देत आहे असे सांगितले.

तिथे पोलिसांचा फौजफाटा तात्काळ दाखल झाला त्यांच्यासह बॉम्ब तपासणी पथक अग्निशामक दल ही आले.पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले त्याची अंग झडती घेतली परंतु त्याच्याजवळ बॉम्ब किंवा आरडीएक्स असे काहीही नव्हते त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा निष्वास सोडला.

या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. बॉम्ब हा शब्द ऐकून परिसरात भीतीचे वातावरण पसरले. रुग्णवाहिका बोलावून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तो मानसिक विकलांग असल्याचे सांगितले.

विश्रामगृहाबाहेर माझ्याजवळ बॉम्ब आहे असे सांगून दंगा करणारा शिवाजी दडस हा रायगड एसटी डेपोत वाहक म्हणून कार्यरत होता परंतु गतवर्षी पासून त्याला निलंबित करण्यात आले आहे त्याला रायगड डेपोतून बदली हवी असताना ती होत नसल्याने तो तणावात आहे तसेच त्याला दारूचे व्यसनही असल्याची माहिती पोलिसांनी दिली या तणावातून तो असे कृत्य करत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow