महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न

May 12, 2024 - 06:05
May 12, 2024 - 06:07
 0  985
महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न

आय मिरर

नांदेडच्या किनवट शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.किनवट शहरातील मुख्य भाजी मार्केट मध्ये प्रियंका सातपुते या 35 वर्षीय महिलेला तिच्याच पतीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलेय.सायंकाळी 7 वाजता ही घटना घडली आहे.

प्रियंका सातपुते हीचा पती अर्जुन सातपुते याने ही कृत्ये केले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी या महिलेला लागलेली आग विझवली.सध्या या महिलेवर किनवट येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रियांका हीचा पती दुसऱ्या महिलेसोबत राहत होता त्यामुळे प्रियांका ही मागील 2 वर्षांपासून माहेरी होती. दोघांमध्ये घरगुती कारणावरून अनेकदा वाद व्हायचे.किनवट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow