निःशब्द..! उमलत्या कळ्यांचा दुर्दैवी अंत आंबेगावच्या निरगुडसर मधील मन सुन्न करणारी घटना 

May 25, 2024 - 06:59
 0  319
निःशब्द..! उमलत्या कळ्यांचा दुर्दैवी अंत आंबेगावच्या निरगुडसर मधील मन सुन्न करणारी घटना 

आय मिरर

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे शुक्रवारी दि.24 रोजी दुपारी तीनच्या सुमारास शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या श्रध्दा काळू नवले, सायली काळू नवले, दीपक दत्ता मधे, राधिका नितीन केदारी या चार चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही मुले शेतमजूर कुटुंबातील आहेत.उमलत्या कळ्यांचा हा दुर्दैवी अंत झाला असून ही घटना मन सुन्न करणारी आहे. 

शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुले शेततळ्याजवळ खेळत होती.शेततळ्याजवळ खेळत खेळत ते सर्वजण तळ्यात उतरले. शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तसेच पोहता येत नसल्यामुळे सर्वजण पाण्यात बुडाले.

सायली काळू नवले (वय 11 ) ,श्रद्धा काळू नवले (वय 13 ), दीपक दत्ता मधे (वय- 7 रा- कान्हेवाडी, राजगुरुनगर)  आणि राधिका नितीन केदारी (वय -14 रा. कानेवाडी राजगुरुनगर)अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. 

शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुले शेततळ्यामध्ये उतरली होती. त्यांना पोहता येत नव्हते. ही मुले बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कवठे त्यांची पत्नी ज्योती तातडीने शेततळ्याजवळ गेले. पण तोपर्यंत मुलांचे प्राण गेले होते.

चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आई वडील आणि नातेवाईकांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. नातेवाईकांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा आहे. चारही मुलं तळ्याशेजारी हसत खेळत खेळती होती. केवळ मजा म्हणून पाण्यात उतरली आणि घात झाला. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow