रवींद्र बाळासाहेब हाकेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मदनवाडी गावावर शोककळा
आय मिरर भिगवण ( नारायण मोरे )
मुंबई पोलीस दलात कर्तव्य बजावीत असताना अपघाती निधन झालेल्या पोलीस जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मदनवाडी येथे पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातील १० पोलीस जवानासह प्रभारी पोलीस अधिकारी विनोद महांगडे यांनी मृत पोलीस जवानाच्या पार्थिवाला अखेरची सलामी दिली.
मुंबई पोलीस दलात सेवा बजावीत असणाऱ्या मदनवाडी गावच्या रवींद्र बाळासाहेब हाके या पोलीस जवानाचा रविवारी १२ वाजण्याच्या सुमारास रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला होता .आज सोमवारी सकाळी ८.३० वाजता त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथून १० पोलीस जवान तसेच भिगवण पोलीस जवान आणि प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सलामी देण्यात आली.हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत पुष्पचक्र अर्पण करून हि अखेरची सलामी देण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थिती लावून पार्थिवाचे दर्शन घेतले.
यावेळी मदनवाडी गावचे सरपंच प्रतिनिधी नानासाहेब बंडगर ,विष्णुपंत देवकाते ,दीपक बंडगर यांनी पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अनेक तरुणांनी उपस्थिती लावली होती.पोलीस जवान रवींद्र यांच्या पाठीमागे पोलीस ट्रेनिंग घेणारा एक भाऊ ,आई वडील बहिण आणि पत्नी आणि लहान बाळ असा परिवार आहे.त्यांच्या अपघाती मृत्यूने मदनवाडी आणि परिसरावर शोककळा पसरली असल्याचे दिसून आले.
What's Your Reaction?