लोणी देवकर येथील बँक आँफ बडोदा मधील असिस्टंन्ट मॅनेजरला टोळक्याकडून मारहाण

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील बँक आँफ बडोदा मधील असिस्टंन्ट मॅनेजरला किरकोळ वादातून एका ग्राहकासह आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी राॅडने मारहाण केल्याची घटना घडली असून शुक्रवारी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास ही धक्कादायक बाब घडली आहे. गणेश कडाकणे असं मारहाण झालेल्या बँक कर्मच्याऱ्याचे नांव आहे.
इंदापूर पोलिसा ठाण्यात या घटनेबाबात शाखाधिकारी मनोज बाळासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरुन लोणी देवकर येथील सागर थोरात याच्यासह अन्य नऊ जणांविरुध्द शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की,मनोज बाळासाहेब भोसले हे बैंक ऑफ बडोदा लोणी देवकर येथील शाखेत शाखा अधिकारी कार्यरत आहेत.शुक्रवारी दि.30 ऑगस्ट 2024 रोजी भोसले बँकेत कर्तव्यावर होते.याच वेळी नेहमीचा बँक ग्राहक असलेला सागर नवनाथ थोरात रा. लोणी देवकर ता. इंदापुर जि पुणे हा त्याच्या पत्नीच्या बैंक खात्यातील नाव दुरुस्तीसाठी त्यांची पत्नी व मुली सोबत आला होता.
त्यावेळी फिर्यादी भोसले यांनी त्यांची कागदपत्रे तपासली व त्यानंतर सहकारी महेश कुमार अय्यर यांचेकडे पुढिल कार्यवाही करीता पाठवीली. तेव्हा सागर थोरात हा दारू पिल्याचा वास येत होता व तो दारूचे नशेत मोठमोठ्याने बोलत होता.
त्यानंतर सागर थोरात हा अय्यर यांचे समोरील काउंटर जवळ रांगेत उभा असलेल्या ग्राहकांना बाजुला सारून मध्ये घुसुन कांन्टरजवळ आला व माझ्या पत्नीच्या नावाची दुरूस्ती आत्ताचे आत्ता करून द्या नाहीतर मी तुमचे बँकेतील कॅम्पुटर व इतर साहित्याची तोडफोड करेल असे बोलुन वाद घातला.
शाखेतील असिस्टंन्ट मॅनेजर गणेश कडाकणे हे त्यांचा वाद सोडवीण्यासाठी गेले असता त्यांचेशी देखील वाद घालुन शिवीगाळ करून बाहेर जाताणा गणेश कडाकणे यांना तु बाहेर ये तुझ्याकडे पाहुन घेतो तुझे हातपाय तोडतो अशी धमकी देवुन निघुन गेला.
सायंकाळी साडेपाच चे सुमारास बँक शाखेतील कामकाज आटपुन बंद करून घरी जाण्यासाठी सर्व कर्मचारी मोटासायकलवरून निघाले असता सागर थोरात हा त्याच्या साथीदारांसोबत काही मोटारसायकली घेवुन मागे येत असल्याचे लक्षात आले.यानंतर शिवाजी चौकातुन पुढे आल्यावर सागर थोरात त्याच्या सोबत असणाऱ्या इतरांनी गणेश कडाकणे यांना मोटारसायकलवरून खाली उतरावुन लाथबुक्यांनी मारहाण केली.
गणेश कडाकणे याला मोटारसायकलवर बळजबरीने बसवुन घेवून पळसदेवचे दिशेला घेऊन जात स्मशानभुमीजवळ थांबवले कडाकणे यांस सागर थोरात याने त्याचे सोबत आणलेल्या लाकडी काठीने दोन्ही पिंडरीवर व पाठीत मारहाण केली.तर निखील थोरात याने लोखंडी रॉडने कडाकणे याचे डोक्यावर मारत असताना डावा हात मधी घातला असता डाव्या हातावर मार लागुन दुखापत झाली. गणेश कडाकणे हे शिताफीने स्वताला वाचवुन घटनास्थळावरुन पळसदेव दिशेला पळुन गेले.
What's Your Reaction?






