Loksabha 2024 : राजू शेट्टींकडून 'स्वाभिमानी'च्या सहा जागा जाहीर तर रविकांत तुपकरांची ही लोकसभेची तयारी

Jan 2, 2024 - 12:50
Jan 2, 2024 - 13:12
 0  271
Loksabha 2024 : राजू शेट्टींकडून 'स्वाभिमानी'च्या सहा जागा जाहीर तर रविकांत तुपकरांची ही लोकसभेची तयारी

आय मिरर

आगामी काळातील लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सहा जागांवर स्वाभिमानीचे उमेदवार निवडणुक लढवतील असे निश्चित केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एका मराठी वाहिनीशी बाेलताना दिली.

शेट्टी म्हणाले की,आम्ही दोन वर्षांपूर्वीच महाविकास सरकार सोबतचे संबंध तोडले आहेत. आघाडी सरकारमधून बाहेर पडलो, तिथून पुढे निवडणुका स्वबळावर लढवायच्या असा निर्धार आम्ही केला असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा लोकसभा निवडणूक लढून दिल्लीला जावे असा दबाव असल्याचे सांगितले आहे.स्वाभिमानीने यंदा सहा जागांवर लोकसभा निवडणुक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी एक बुलढाणा आहे. रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक लढवावी असेही शेट्टींनी नमूद केले.

दरम्यान स्वाभिमानी यंदा बुलढाणा, हातकणंगले, परभणी, काेल्हापूर, सांगली, माढा या मतदारसंघात लाेकसभेसाठी उमेदवार उभे करेल. या जागांवर निवडणूक लढविण्याचे नियाेजन यापूर्वीच ठरले आहे असेही राजू शेट्टींनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow