इंदापुरात अजित पवार गटात फुट नाही,जिल्हाध्यक्ष गारटकरांच्या बॅनरबाजी वरून आ.भरणेंची प्रतिक्रिया

Jul 7, 2024 - 07:04
Jul 7, 2024 - 07:33
 0  868
इंदापुरात अजित पवार गटात फुट नाही,जिल्हाध्यक्ष गारटकरांच्या बॅनरबाजी वरून आ.भरणेंची प्रतिक्रिया

आय मिरर

पुण्याच्या इंदापूर मध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भावी आमदार असा फ्लेक्स पुण्याच्या इंदापुरात झळकला आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली की काय असा प्रश्न उपस्थित झालाय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडले नसल्याचं अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे.

बॅनरबाजीने काहीही होत नसतं, मी अधिवेशनात होतो मलाही बाब समजले मी तात्काळ माझा लावलेला बॅनर काढायला लावलेला आहे. महायुतीचे वरिष्ठ नेते जे ठरवतील तो निर्णय मान्य करायचं आम्ही सर्वांनी ठरवलं आहे आम्ही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेलो नाही.

गारटकर यांचा भावी आमदार म्हणून बॅनर लागला आहे याचा मला आनंद आहे शेवटी लोकशाहीमध्ये सर्वांना ते आमचे वरिष्ठ आहेत असंही भरणे यांनी म्हटलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow