इंदापुरात पाटील-पवार एकाच बॅनरवर ! हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा बॅनरबाजी
आय मिरर
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो आणि तुतारी चिन्ह असलेला व इंदापूर तालुक्यातील जनतेची झाली तयारी हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी ! असा उल्लेख करत फलक लागल्यामुळे इंदापूर शहरात लागल्यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात पाटील आता तुतारी हाती घेणार का याचीच चर्चा रंगू लागली आहे.
रविवारी 8 आठ ऑगस्ट रोजी इंदापूर शहरातील जुन्या काँग्रेस भवन च्या समोर हा फलक लागला असून तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मागील काही दिवसात हर्षवर्धन पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती .त्यावेळी पाटील यांनी या ठिकाणी कोणती राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. तर शनिवारी सात ऑगस्ट रोजी मुंबई येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी गणरायाच्या आरती केली या ठिकाणी त्यांनी आपण असा कोणताही निर्णय घेतलेला नसून महायुतीतच आहोत असे स्पष्ट केले होते.
दरम्यान रविवारी या तुतारीच्या फलकामध्ये आता त्यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश होतो की काय असे चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांचे शरद पवार यांच्याबरोबर फलक शहरात लागले होते
इंदापूर शहरात हा फलक लागल्यानंतर काही कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांनी देखील पाटील यांनी हाती तुतारी घ्यावी अशी मागणी करत जर त्यांनी विधानसभा न लढवता विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतला तर आम्ही प्रसंगी आत्मदहन करू असे देखील काही समर्थकांनी सांगितले.
What's Your Reaction?