तहसीलदार बनसोडे कामाचा माणूस ! राष्ट्रवादी काँग्रेस सह इतर संघटनांकडून पाठराखण

Nov 19, 2026 - 19:12
Nov 19, 2026 - 19:25
 0  87
तहसीलदार बनसोडे कामाचा माणूस ! राष्ट्रवादी काँग्रेस सह इतर संघटनांकडून पाठराखण

आय मिरर 

पुण्याच्या इंदापुरात तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कामकाजावरून सत्तेत असणारे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यासह इतर पक्ष 25 नोव्हेंबरला आमने-सामने उतरणार आहेत. एकीकडे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या समर्थनार्थ राजकीय नेते एकवटले असताना दुसरीकडे एसआयआर प्रक्रियेवरून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांमुळे इंदापूरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

काल बुधवारी 18 नोव्हेंबर रोजी भाजपा सह इतर संघटनांनी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कामकाजा विरोधात 25 नोव्हेंबरला इंदापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केलं.त्यानंतर आज गुरुवारी 19 नोव्हेंबर रोजी सत्तेत सहभागी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर संघटनांनी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या समर्थनार्थ आम्ही देखील 25 नोव्हेंबरला इंदापूर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केलेय.

इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन मध्ये या संदर्भातील पत्रकार परिषद पार पडली,यावेळी उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या कार्यपद्धतीला समर्थन दर्शविले.

आम्ही देखील भाजपबरोबर सत्तेत भागीदारी पक्ष आहोत तहसीलदार यांचं काम चांगलं आहे, त्यांनी सुरुवात केली आहे आम्ही शेवट करू असा थेट इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिलाय.त्यामुळे इंदापूर मध्ये तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कामकाजाच्या मुद्द्यावरून मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. 

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शरद पवार गटाचे नेते एडवोकेट राहुल मखरे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक संजय सोनवणे,पंचायत समिती सभापती हर्षवर्धन लोंढे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,कार्याध्यक्ष अतुल झगडे, राष्ट्रवादीचे नेते सचिन सपकळ, पंचायत समिती सदस्य दिलीप भिसे, अशोक इजगुडे, शिवाजी तरंगे,सचिन खामगळ,नवनाथ रुपनवर, पोपट शिंदे, स्वप्निल राऊत, शेखर पाटील,सुहास बुटे यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर (SIR) प्रक्रियेवरून इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राहुल मखरे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे आणि जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकाळ यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान, एसआयआर प्रक्रियेचा वापर करून इंदापूर तालुक्यातील दलित आणि मुस्लिम समाजातील मतदारांची नावे मतदार यादीतून हटविण्याचा प्रयत्न भाजपाने करू नये, असा स्पष्ट इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिला. मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी, अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल मखरे यांनी मतदार यादीतून नाव वगळण्यावरून काही व्हाईस रेकॉर्ड समोर आणत भाजप पक्षावर गंभीर आरोप केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow