अजितदादांनी VSR ने प्रवास केला तसाच रोहितदादांनी देखील... उदय सामंत काय म्हणाले ? 

Nov 19, 2026 - 20:55
 0  38
अजितदादांनी VSR ने प्रवास केला तसाच रोहितदादांनी देखील... उदय सामंत काय म्हणाले ? 

आय मिरर 

दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार वारंवार व्ही एस आर कंपनीला टारगेट करत आहेत.दरम्यान 104 वेळा अजित पवार यांनी चार्टर विमानाने प्रवास केलाय त्यापैकी 85 वेळा व्ही एस आर कंपनीच्या विमानाने अजितदादांचा प्रवास झालेला आहे. यावर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिले आहे.

बारामती शहरात शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ भवन नावानं जिल्हा जनसंपर्क कार्यालय निर्माण करण्यात आलं आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी गुरुवारी 19 नोव्हेंबर 2026 रोजी या एकनाथ भवनला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.

मंत्री सामंत म्हणाले की,कंपनी व्ही एस आर आहे की कोणती आहे याच्यापेक्षा कोणत्या सुरक्षित विमानाने आपण प्रवास करतो यावर सर्व अवलंबून आहे.याच कंपनीच जेट विमान होतं आणि ते अपघात ग्रस्त झालं,त्यामुळे सर्वांची मागणी अशी होती या अपघाताची चौकशी झाली पाहिजे.अपघाताची चौकशी होत असताना व्ही एस आर ला पाठीशी घाला किंवा घालू नका अशी कोणाचीही भूमिका कोणाची नाही असं सामंत म्हणाले.

जसं अजित दादा व्हि एस आर चा वापर करायचे तसं रोहित दादा व्हि एस आर चा वापर करायचे.अनेकदा त्यांनी व्हीएसआर मधून प्रवास केलेल्याचे व्हिडिओ काल-परवा पासून वायरल होत आहेत.कंपनी कोणती आहे याच्याशी काही घेणं देणं नाही अपघाताची चौकशी झाली पाहिजे यावर आम्ही कायम आहोत. असं ही ते म्हणाले.

तो अपघात कशामुळे झाला कसा झाला हे जनतेसमोर आलं सर्व शंका दूर होतील.पण व्हीएसआर ने जस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी प्रवास केला तसा अजित दादांनी प्रवास केला.तसाच रोहित दादांनी देखील प्रवास केल्याचे व्हिडिओ आम्ही बघत आहोत. असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow