मोठी बातमी | इंदापूर विधानसभा मतदारसंघातून प्रवीण माने अपक्ष निवडणूक लढवणार…
आय मिरर
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून प्रवीण माने अपक्ष निवडणूक लढणार आहेत.23 ऑक्टोबरला प्रवीण माने हे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे इंदापूर मध्ये आता तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जातेय. स्वत: प्रवीण माने यांनी आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे.
गेल्या काही दिवसापांसून प्रवीण माने निवडणूक लढविणार की नाही याबाबत चर्चा सुरू होत्या. विविध तर्कवितर्क लावले जात होते अखेर प्रवीण माने हे अपक्ष निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.आय मिरर डिजिटल ला स्वत: प्रविण माने यांनी आपण 23 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितले आहे त्यामुळे इंदापूर मध्ये आता तिरंगी लढत होणार आहे.
प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील युवा नेते आहेत.नुकताच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि पक्षाकडून त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. यामुळे प्रवीण माने जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष भरत शहा हे नाराज झाले होते. या नाराज नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात बंड पुकारलं आहे.11 आक्टोंबर रोजी इंदापूर बाजार समितीत परिवर्तन मेळावा ही पार पडला. त्यानंतर अखेर प्रवीण माने हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे मैदानात असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे हे मैदानात असतील तर आता प्रवीण माने हे देखील अपक्ष इंदापूरची निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे इंदापूरची निवडणूक ही आता चुरशीचा विषय बनली आहे.
What's Your Reaction?