भिगवण मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अज्ञात पुरूषाचा मृतदेह

Oct 9, 2024 - 20:28
 0  632
भिगवण मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अज्ञात पुरूषाचा मृतदेह

आय मिरर (निलेश मोरे)

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अनोळखी पुरुषाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे त्याचे वय ३५ ते ४० वर्षे आहे.

भिगवण येथील गट नं.३२९ मधील थोरातनगर मध्ये एका ३ मजली अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डींगचे पहिल्या मजल्यावरील एका रूममध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. 

रूममध्ये खिडकीच्या ग्रिलला नायलॉन पट्टीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह दिसून आला. त्याबाबत कॉन्ट्रॅक्टर यांनी भिगवण पोलीस स्टेशन येथे खबर दिली. 

मयत अज्ञात इसम यास भिगवण ग्रामीण रूग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्यास तपासून तो मयत झालेचे घोषित केले आहे. सदर मयताची ओळख अद्याप पटली नाही.

संबंधीत मयता बाबत काही माहिती मिळाल्यास भिगवण पोलिसांनी 9552164100 किंवा 9422150050 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

मयताचे वर्णन :- एक अनोळखी पुरूष जातीचे प्रेत वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, नेसणीस पांढ-या रंगाचा फुल शर्ट त्यामध्ये पांढ-या रंगाचा फुल बनियान, काळी पॅन्ट व राखाडी रंगाची त्यावर काळे पांढरे रेघा असलेली इजार, डोकीस टक्कल, दाढी मिशा काढलेली, सडपातळ बांध्याची अशी अनोळखी मयताचे वर्णन आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow