इंदापूर तालुक्यातील त्या मुलीचा जगण्याचा संघर्ष संपला ! उपचारादरम्यान मृत्यू

Jul 31, 2024 - 14:31
 0  3512
इंदापूर तालुक्यातील त्या मुलीचा जगण्याचा संघर्ष संपला !  उपचारादरम्यान मृत्यू

आय मिरर

इयत्ता नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नजर ठेवत थेट तिच्या घरी जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका शाळेतील कारकूनाने केला होता.संबंधित मुलीने या कारकूनास प्रतिकार केल्याने आरोपीने तिला कीटकनाशक औषध पाजून बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी दि.28 जुलै पुण्याच्या इंदापूर तालुक्यात घडला होता. 

दरम्यान अकलूज मधील खाजगी रुग्णालयात या अल्पवयीन मुलीवर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान आज या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

उरण ची घटना ताजी असताना आता इंदापूर तालुक्यात देखील थरकाप उडवणार प्रकार घडल्यानं मुलींच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झालाय.

रणजित जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नांव असून पोलिसांनी आरोपी विरोधात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आता मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या आरोपी विरोधात पोलिसांकडून खूनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी रणजित जाधव याने आपल्या घरी येऊन अंगलगट करण्याचा प्रयत्न केला, बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यास आपण प्रतिकार केला आणि याच वेळी रणजीत जाधव याने आपल्याला कीटकनाशक पाजलं अशी फिर्याद देखील पोलिसांनी दाखल केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow