बिग ब्रेकिंग || पुण्याच्या भिगवण मध्ये बसचालकाने 62 वर्षीय नागरिकास चिरडले
आय मिरर
पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकापासून निघालेल्या दोन एसटी ड्रायव्हरच्या बस पुढे घेण्याच्या शर्यतीमुळे अपघात घडून एका ६२ वर्षीय नागरिकाला जीव गमवावा लागलाय तर दोघे जखमी होवून अनेक दुचाकीचे नुकसान झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी ०२ ऑक्टोबर रोजी घडली आहे.
गंगाराम सोमा पवार असं बासष्ठ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून संदीप विठ्ठल डोंबाळे वय 35 वर्षे आणि मनोहर विठ्ठल बंडगर वय 50 वर्षे अशी जखमींची नांवे आहेत. हे दोघेही इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावचे रहिवासी आहेत.भिगवण पोलीसात बस चालक अशोक पांडूरंग साळुंखे राहणार नागझरवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव याच्या विरोधात 304 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती भिगवणचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
एम एच 20 बी एल 3877 क्रमांकाची धारशिव जिल्ह्यातील कळंब एस टी डेपो ची ही बस असून ती पुण्यावरुन कळंब कडे निघाली होती.दरम्यान भिगवण बस स्थानकापासून दोन बस पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे.
अपघात घडल्यावर एसटी ड्रायव्हर ने भिगवण पोलिसांत हजेरी लावून ब्रेक फेल झाल्याची बतावणी केलीय.मात्र बस स्थानकासाठी असणाऱ्या सर्विस रस्त्याने येणाऱ्या दोन बस चालकामध्ये पुढे जाण्याची शर्यतीमुळे हा अपघात घडल्याचा थरार प्रत्यक्षदर्शी आणि जखमी संदिप विठ्ठल डोंबाळे यांनी सांगितला आहे.
उजव्या बाजूने असणाऱ्या गाडीने मुख्य मार्गावर प्रवेश मिळविला मात्र डाव्या बाजूने येणाऱ्या बस ड्रायव्हरचे लक्ष विचलित झाल्याने मृत पवार बस खाली चिरडले गेले.यावेळी अपघात ग्रस्त चालकाने बस ड्रेनेजच्या कठड्यावर चढविल्यामुळे बस थांबली मात्र तोपर्यंत ७ ते ८ दुचाकी गाडी खाली चेंगारल्या गेल्या.
या अपघातात मृत पवार यांच्यासह दोन जन जखमी झाले आहेत. अपघातानंतर बस चालकाने भिगवण पोलीस ठाण्यात हजर होवून ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याची माहिती दिली. मात्र १०० फुटावरील स्थानकांत बस व्यवस्थितपणे थांबली असल्याची नागरिकांनी माहिती दिली. सदर घटनेचा पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?