पुणे सोलापूर महामार्गावर डाळज चौकात दुचाकीला कारची धडक ! दोघे गंभीर जखमी

Jan 16, 2024 - 11:05
Jan 16, 2024 - 11:26
 0  690
पुणे सोलापूर महामार्गावर डाळज चौकात दुचाकीला कारची धडक ! दोघे गंभीर जखमी

आय मिरर(देवा राखुंडे) 

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज नंबर दोन गावच्या हद्दीत डाळज चौकामध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला चार चाकी कार ने धडक दिल्याने दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. संतोष दादा पिसे आणि विनोद पांडुरंग पिसे रा. सवळी ता. कर्जत जि.अहमदनगर अशी जखमींची नांवे आहेत.हा अपघात मंगळवार दि.16 जानेवारी रोजी सकाळी 07 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्हावर डाळज नं.2 च्या हद्दीत डाळज चौकात झाला आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे बाजू कडून सोलापूर बाजूकडे जाणारी मोटरसायकल क्रमांक MH 16 DH 8367 ही कळस बाजूकडे जाण्यासाठी चौकातून रस्ता ओलांडत होती.याच दरम्यान सोलापूर बाजू कडून पुणे बाजूकडे जाणारी किया कार वाहन क्रमांक MH 45 AU 2019 हिने या मोटरसायकलला धडक दिल्याने अपघात झाला.

यात मोटरसायकल वरील प्रवासी संतोष दादा पिसे वय 31 वर्षे आणि विनोद पांडुरंग पिसे वय 24 दोन्ही राहणार सवळी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या दोघांचेही डावे पाय फ्रॅक्चर झाले. त्यांना तात्काळ केतन वाघ यांच्या रुग्णवाहिकेतून लाईफ लाईन हॉस्पिटल भिगवण येथे उपचार कामी पाठवण्यात आले.विशेष म्हणजे दुचाकीवरील दोघांनीही प्रवासावेळी डोक्यास हेल्मेट लावलेले होते त्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली.

अपघातातील किया कार रस्त्यावर वाहतूकीस अडथळा ठरत होती तिला मृत्युंजय दूत भरत बबन उगले रा. पिलेवाडी व स्थानिक गावकऱ्यांच्या सहकार्याने रस्त्याचे बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.अपघतस्थळी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस फौजदार भागवत शिंदे व तीन पोलीस कर्मचा-यांनी तात्काळ भेट दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow