३००० दिलं नाहीत म्हणून टक्कुऱ्यात थेट खोऱ्याचा दांडाच घातला ! भिगवण मध्ये काय घडलं 

Dec 3, 2024 - 12:35
 0  1849
३००० दिलं नाहीत म्हणून टक्कुऱ्यात थेट खोऱ्याचा दांडाच घातला ! भिगवण मध्ये काय घडलं 

आय मिरर(निलेश मोरे)

मकेच्या तीन हजार रुपयाच्या व्यवहारातून झालेल्या वादामधून इंदापूर तालुक्यातील भिगवण नजीकच्या मदनवाडीत एकाच्या डोक्यात थेट लोखंडी दांडा असलेला खोऱ्या घातल्याची धक्कादायक घटना घडली असून यात महेश सुधीर कोकरे हे जखमी झालेल्या त्यांच्यावर पुण्यात रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात सुंदर तुकाराम ढवळे रा. मदनवाडी ता. इंदापुर जि. पुणे याच्या विरुध्द महेश कोकरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील महेश कोकरे आणि सुंदर ढवळे यांच्यात मक्यावरुन तीन हजार रुपयांचा व्यवहार झाला होता.

सोमवारी दि.02 डिसेंबर रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास मदनवाडी गावचे हद्दीतील जमिन गट न 569 मध्ये या दोघांमध्ये वाद झाले.फिर्यादी महेश कोकरे कडे असेलेले मकाचे पैसे 3,000/-रुपये दिले नाहीत या कारणावरुन सुंदर ढवळे याने चिडुन जावुन कोकरे याच्या डोक्यात लोंखडी दांडा असलेले खोरे मारुन फिर्यादीला जखमी केले. शिवाय कोकरे याच्या शेतातील पाईप लाईनचा वॉल तोडुन नुकसान ही केले.कोकरे हा जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत.गुन्ह्याचा तपास सहा.पोलिस निरीक्षक विनोद महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक पाटील करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow