Big Breaking मारकडवाडी गावातील बॅलेट पेपर वरील मतदान रद्द ! आ.उत्तम जानकर यांनी केली घोषणा
आय मिरर
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्करवाडी गावात बॅलेट पेपर वरती ग्रामस्थ मतदान प्रक्रिया घेणार होते. यासंदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवडणूक प्रक्रिये बाबत मागणी देखील केली होती,मात्र प्रशासनाने याला विरोध दर्शवला होता.याशिवाय गावात जमावबंदी आदेश देखील लागू करण्यात आला होता. अखेर ही बॅलेट पेपर वरील मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची घोषणा माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे.
जमाबंदीच्या आदेश असल्याने आणि प्रशासनाचा दबाव असल्याने आम्ही वेगळ्या मार्गाने न्याय मिळवू.शालेय मुलांचे आणि इतर कोणाचही नुकसान होऊ नये. गावाची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा घेतला निर्णय असल्याचं जानकर यांनी म्हटले आहे.येत्या पंधरा दिवसात ईव्हीएम बाबतचे सर्व पुरावे महाराष्ट्रला देणार असल्याचं ही जानकर यांनी सांगितले आहे.
बॅलेट पेपर वरील मतदान प्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आमदार उत्तम जानकर आणि मारकडवाडी ग्रामस्थ यांच्यात बैठक पार पडली.ग्रामपंचायतीच्या बंद खोलीत बैठक पार पडली.पोलिसांनी लोक एकत्र आल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.मारकडवाडी गावात जमावबंदी आदेशाचे पालन करण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळाले.पोलीस आणि आमदार उत्तम जानकर यांनाच्यात चर्चा झाली.चर्चे नंतर मतदानाचा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान मतदान प्रक्रियेसाठी गावात मतदान कक्ष उभे करण्यात आले होते.
What's Your Reaction?