मोठी बातमी | 'उजनी' पुढील दोन दिवसात मायनस मध्ये जाणार

Apr 16, 2025 - 07:43
Apr 16, 2025 - 07:43
 0  293
मोठी बातमी | 'उजनी' पुढील दोन दिवसात मायनस मध्ये जाणार

आय मिरर 

पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण पुढील दोन दिवसांमध्ये मायनस मध्ये जाण्याची शक्यता आहे. उजनी धरण हे केवळ आता साडेतीन टक्के प्लस आहे. म्हणजे उजनी मध्ये केवळ 2 टीएमसी इतकाच जिवंत पाणीसाठा आहे. त्यानंतर उजनी धरण हे मृत पाणी साठ्यात जाणार आहे. सध्या उजनी धरणा मधून भीमा नदी पात्रामध्ये 6 हजार क्यूसेक ने विसर्ग सुरू आहे त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.

पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 110 टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी असून यांपैकी 63 टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर 54 टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते.

सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या 65 पूर्णांक 57 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे.

या उपयुक्त पाणीसाठ्यातून धरणावर अवलंबून असलेल्या पाणी योजना, सिंचन योजना व उद्योगीकरणास पाणी पुरवठ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. मात्र, दरवर्षी धरणातील मृतसाठ्यातील निम्म्याहून अधिक पाणीसाठा संपेपर्यंत पाणी वापरले जाते. धरणात प्रत्यक्ष पाणीसाठ्यास ऑगस्ट, बर महिना उजाडतो.

उजनी धरणाची आजची स्थिती काय ?

  • एकुण पाणीपातळी 1856.83 दशलक्ष घन मिटर
  • उपयुक्त पाणीपातळी 54.02 दशलक्ष घन मिटर
  • एकुण पाणीसाठा 65.57 टीएमसी
  • उपयुक्त पाणीसाठा 1.91 टीएमसी
  • धरणात उपयुक्त पाणी साठा 3.56 टक्के

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow