आंब्याच्या पेटी आड काय दडलं होतं? जे सापडलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
आय मिरर
बारामती तालुक्यातील मोरगाव-सुपा रोडवरील मुर्टी गावाच्या हद्दीत गोवा राज्यात निर्मित असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्काच्या दौंड विभागाने धडक कारवाई केलीय.यात १२ लाख ६१ हजार रुपयांच्या किमतीच्या विदेशी मद्यासह एकूण ३० लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यात नामदेव हरिभाऊ खैरे,संदीप बबन सानप,गोरख भगवान पालवे आणि महेश गुलाबराव औताडे (सर्व रा. अहमदनगर जिल्हा) यांना अटक केली आहे.
चार चाकी वाहनात वाहनामध्ये आंब्याच्या रिकाम्या लाकडी पेट्यांच्या आड लपवून गोवा राज्यात निर्मित मध्याच्या दारूचा साठा हा अहमदनगर कडे विक्री चालवला होता राज्य उत्पादन शुल्काच्या दौंड विभागाने कारवाई करतो ताब्यात घेतला आहे.शिवाय दोन चारचाकी वाहने असा एकूण ३० लाख ११ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,संचालक (अं.व.द.) प्रसाद सुर्वे यांचे आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग बी.राजपुत, उपअधीक्षक उत्तमराव शिंदे, सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, पुणे या पथकाने रविवारी ही कारवाई केली.
पुणे जिल्ह्यातील दौंड विभागातील मोरगाव-सुपे रस्त्यावर मुर्ती गावच्या हद्दीत एका हॉटेल नजिक संशयित वाहन क्र. एमएच १६ सीडी ५४१९ हे बोलेरो पिक-अप वाहन व वाहन क्र. एमएच १२ एमएफ ६५७५ ही क्रेटा गाडी थांबवून वाहन चालकांकडे वाहनामध्ये काय आहे, याबाबत चौकशी केली असता, दोन्ही वाहनचालक यांनी समाधानकारकपणे उत्तर दिले नाही. वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये आंब्याच्या रिकाम्या लाकडी पेट्यांच्या आड लपवून गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असलेले विविध विदेशी मद्य ब्रँडचे एकूण १२ लाख ६१ हजार रु. किंमतीचे विदेशी मद्य तसेच दोन चारचाकी वाहने - अं. किंमत रु. १७ लाख ५० हजार तसेच दोन मोबाईल हँडसेट अं. किंमत ६० हजार असा एकूण रु. ३० लाख ७१ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींच्या तपासातून स्पष्ट झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८०,८१,८३,९० व १०८ अन्वये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड यांनी गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाईत निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, जवान शुभम भोईटे, जवान नि. वाहन चालक केशव वामने, जवान नवनाथ पडवळ, जवान अशोक पाटील, जवान चंद्रकांत इंगळे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रदीप झुंजरुक (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड- २) हे करत आहेत.
What's Your Reaction?