दादांची आठवण आली अन् हुंदका आवरेना, आभाळा एवढं दुःख मागे टाकून सुनेत्रा पवार पुन्हा उभ्या
आय मिरर
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अद्यापही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दुःखातून सावरलेल्या नाहीत. एका कार्यालयातील मीटिंग वेळी कागदपत्र पाहत असताना सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या आठवणीने अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ त्यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल माध्यमातून पोस्ट केलाय. जात काही क्षण सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या आठवणीने भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर सुनेत्रा पवार स्वतःला सावरताना ही पाहायला मिळतात.
28 जानेवारी रोजी बारामती येथील राजकीय कार्यक्रमांना येत असताना अजित पवार यांच्या विमानाला बारामती तालुक्यातील गोजूबावी परिसरात अपघात झाला. यात अजित पवार यांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
अजित पवार यांच्या निधनाला आता जवळपास पंधरवडा ओलांडून गेला आहे मात्र अद्यापही या दुःखातून ना पवार कुटुंब सावरलय ना महाराष्ट्र सावरलाय. क्षणोक्षणी अजित पवार यांच्या आठवणींची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या नजरेसमोरून तरळून जात आहेत. अगदी या दुःखातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील सावरलेल्या नाहीत.
आभाळा एवढं दुःख पाठीशी टाकून सुनेत्रा पवार राष्ट्रवादीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आणि कुटुंबासाठी पुन्हा उभा राहिल्या आहेत. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार आता अजित पवार यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून आपला पुढचा प्रवास करीत आहेत.
मात्र या प्रवासात अचानक सुनेत्रा पवार यांसमोर अजित पवार यांचे काही किस्से काही आठवणी अचानक येतात त्यावेळी मात्र त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. सुनेत्रा पवार काही क्षणांसाठी का होईना मात्र भावूक होतात, नकळत का होईना त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या होतात, आणि हेच कॅमेऱ्यात कैद झालेलं दृश्य त्यांचे पुत्र जय पवार यांनी त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्म वरती शेअर केलं आहे.
What's Your Reaction?