जैसी करनी...वैसी 'भरणे' अंकिता पाटलांच ट्विट ! आ.रोहित पवारांनी वाभाडे काढले तर खा.सुळेंनी सूचक इशारा दिला
आय मिरर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांची सभा पार पडलीय. शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खा.सुप्रिया सुळे,आ.रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली आहे.यावेळी रोहित पवार यांनी आमदार भरणे यांवर कमीशन वरुन नांव न घेता टीकास्त्र सोडलेय.
इंदापूर मधील सभेत भाषणा दरम्यान रोहित पवार यांना एक पत्र मिळालं.स्वाभिमानी इंदापूरकर या नावाने ते पत्र होतं आमदार रोहित पवार यांनी हे पत्र वाचून दाखवलं. त्यात असं लिहिलं होतं की इंदापूर तालुक्यात विकासाची कामे आहेत पण प्रत्येक कामात वीस टक्के कमिशन घेतले जाते. असं या पत्रात लिहल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. रोहित पवार पुढे म्हणाले की मी ऐकलं इंदापूर तालुक्यात रस्त्याची 700 कोटी रुपयांची कामे आले मग 20 टक्क्यांनी किती पैसे झाले? आणि यात कोणाचा विकास झाला असं म्हणत रोहित पवारांनी थेट आमदार भरणे यांना नाव न घेता लक्ष केलं.
तर सुप्रिया सुळे यांनी ही आमदार भरणे यांना नांव न घेता गर्भित इशारा दिला आहे. मी टीव्ही वरती बातमी पाहिली की पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका असं सांगितलं जातंय मला त्यांना सांगायचं आहे हा इंदापूर तालुका आहे. इथे पवार साहेबांवरती प्रेम करणारे इतके लोक आहेत की तुमच्या फोनला धमकीला घाबरणार नाहीत. आता तुम्ही तुमचं बघा कारण कार्यक्रम इथे होणार नाही ! करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेला होईल,याची चिंता करा.असं म्हणत सुळे यांनी आमदार भरणे यांवरती निशाणा साधला आहे.
रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हल्लाबोल नंतर भाजपा युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी एक ट्विट केलयं.जैसी करनी.... वैसी "भरणे" असं एका वाक्यात म्हणत अंकिता पाटील ठाकरेंनी सुळे आणि रोहित पवारांनी आ.भरणेंवर केलेल्या टीकेचं समर्थम केलेय.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपलं समर्थन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दर्शवलं त्यामुळे गेले कित्येक दिवस एकत्र असलेले भरणे आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये दरी निर्माण झाली असं सुप्रिया सुळे यांच्या आजच्या टीकेवरून स्पष्ट दिसतय.भाजपचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी आतापर्यंत इंदापूर तालुक्यातील अनेक जाहीर सभांमधून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या वरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. आता त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी तर शरद पवार यांच्या समोरच इंदापुरातील जाहीर सभेमध्ये आमदार भरणे यांच्यावरती नाव न घेता टीकास्त्र सोडलं तर खासदार सुप्रिया सुळे यांनी भरणे यांना एक प्रकारे गर्भित इशाराचं दिला.
दुसरीकडे शरद पवार यांनी केलेले भाषण मात्र चर्चेत आलं. शरद पवार यांनी आपल्या शेतकरी भाषेमध्ये इंदापूरकरांना संबोधन केलं. जिथे आ.भरणे यांना नांव न घेता लेकीने इशारा दिला आणि नातवाने वाघाडे काढले त्याच मंचावर शरद पवार यांनी मात्र कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या कर्तुत्वाचा गोडवा गात डाव टाकत एकप्रकारे हर्षवर्धन पाटील यांच्याशी जवळीक साधलीय.त्यामुळे महायुतीत असणारे हर्षवर्धन पाटील खरंच महायुतीचं काम करतील कि शरद पवारांना साथ देतील ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
What's Your Reaction?