फुल स्टाॅप ! इंदापूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या स्टेटसने उडाली खळबळ

Mar 26, 2024 - 12:31
Mar 28, 2024 - 21:04
 0  3607
फुल स्टाॅप ! इंदापूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या स्टेटसने उडाली खळबळ

आय मिरर

इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरवात झाली आहे. आ.भरणे यांनी गेल्या काही दिवसात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे दोन कार्यकर्ते फोडले आणि राष्ट्रवादी अधिक मजबूत केली.मात्र आता लोकसभेच्या रणधुमाळी हाच डाव आमदार भरणेंवर उलटणार की काय असं चित्र आहे. कारण आमदार भरणेंच्या कळपातील एक युवा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शरद पवारांच्या गटात सहभागी होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या चौथ्या विनिंगला खीळ लावत असताना राष्ट्रवादीलाचं तर गळती लागली नाही ना? असा प्रश्न निर्माण झालाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचा हा युवा पदाधिकारी असून आमदार भरणेंच्या गोटात त्याचं मजबूत वजन आहे.मात्र असं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सख्ख्या धाकट्या भावजयी शर्मिला पवार यांच्याशी ही त्याचे सलोख्याचे संबंध आहेत. गेल्या चार दिवसापासून सुनंदा पवार शर्मिला पवार या खा.सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ इंदापूर तालुका पिंजून काढताहेत.त्यातचं शर्मिला पवारांच्या गळाला हा युवा चेहरा लागल्याची चर्चा असून सोमवारी दि.२५ मार्च रोजी रात्री फुल स्टाॅप असं स्टेटस या युवा कार्यकर्त्याने ठेवलं आणि काही वेळाने ते डिलेट ही केलं मात्र हा युवा पदाधिकारी शरद पवार यांच्या गटात सहभागी होऊन घरवापसी करणार असल्याची चर्चा मात्र तालुक्यात रंगली आहे.

अर्थात त्याचे मतपरिवर्तन झाले की केले हे अद्याप स्पष्ट नसले आणि तो घरवापसी करणार की आहे तिथेच राहणार हे अनुत्तरित असले तरी काही वेळासाठी का होईना घरवापसीचा विचार त्याच्या मनात आला अन् त्याने ठेवलेला स्टेटस ही वाऱ्यासारखा सोशल मीडियात पसरला आणि राजकीय चर्चांना उत आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow