रोहित पवारांच्या समर्थनार्थ इंदापुरात राष्ट्रवादी आक्रमक ! महाराष्ट्राचा एकच वादा रोहित दादा रोहित दादा घोषणाबाजी
आय मिरर(देवा राखुंडे)
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची गुरुवारी पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे. ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास चौकशीचा निषेध म्हणून इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इंदापूर तहसील कार्यालयास निवेदन देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी रोहित पवार आप आगे बढो हम तुम्हारे साथ है , सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है,महाराष्ट्राचा नवा वादा रोहित दादा रोहित दादा आशा रोहित पवार यांच्या समर्थनात घोषणा देखील देण्यात आल्या.
यावेळी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अँड.तेजसिंह पाटील म्हणाले की, आम्ही या हुकूमशाही दडपशाही सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत. सरकार सूडबुद्धीने वागत आहे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.आता तरी सरकारने या सुडाच्या कारवाया थांबवाव्यात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला वेळ खर्च करावा अशी मागणी त्यांनी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे केली असल्याचे सांगितले.
यावेळी अँड.आशुतोश भोसले, अमोल भिसे,ईनायत अली काझी,अरबाज शेख,अक्षय कोकाटे,अनिकेत निंबाळकर, अनिल ढावरे,अक्षय भोसले,गणेश देवकर, बाळासाहेब चितळकर,श्रीकांत मखरे,हिमांशु पाटील,सिकंदर बागवान,संजय शिंदे,राहुल शिंदे,सम्यक बनसोडे,महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, शहराध्यक्षा रेश्मा शेख, तमन्ना शेख,रंजना राऊत यांसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?