चौथीतील धनश्री शाळेत गेली होती पण पुन्हा घरी परतलीच नाही ! रस्त्यात दप्तर आढळलं, नक्की काय घडलं ? 

Dec 16, 2025 - 08:21
Dec 16, 2025 - 08:26
 0  553
चौथीतील धनश्री शाळेत गेली होती पण पुन्हा घरी परतलीच नाही ! रस्त्यात दप्तर आढळलं, नक्की काय घडलं ? 

आय मिरर 

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणारी ९ वर्षीय धनश्री उमेश शिंदे ही चिमुकली गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता ती शाळेत गेली होती,मात्र शाळा सुटल्यानंतर धनश्री सायंकाळी घरी परतलीच नाही.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आई-वडील शेतातून घरी परतल्यानंतर मुलगी न आढळल्याने शाळेत चौकशी केली असता, सायंकाळी 5 वाजेपर्यंत ती शाळेत होती व नंतर घरी निघाल्याचे शिक्षकांनी सांगितले. कुटुंबीय व ग्रामस्थांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र अद्याप पर्यंत तिचा शोध लागलेला नाही.

ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे 4 वाजून 55 मिनिटांनी ती न्हावे रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली आहे.मात्र त्यानंतर तिचा काहीही सुगावा लागलेला नाही. 

दरम्यान, गावाबाहेरील शेत रस्त्यावर धनश्रीचे दप्तर आढळून आले असून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, जळगाव एलसीबीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी गावात ठाण मांडून असून आजूबाजूचा परिसर व शेतशिवार पिंजून काढत असून तिची शोधमोहीम सुरू आहे. मात्र 3 दिवस उलटूनही चिमुकलीचा थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow