बिग ब्रेकिंग | चाळीसगावातल्या बेपत्ता धनश्रीचा मृतदेह विहिरीत सापडला

Dec 16, 2025 - 14:11
Dec 16, 2025 - 14:20
 0  453
बिग ब्रेकिंग | चाळीसगावातल्या बेपत्ता धनश्रीचा मृतदेह विहिरीत सापडला

आय मिरर 

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणारी ९ वर्षीय धनश्री उमेश शिंदे ही चिमुकली गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर तीन दिवसानंतर गावालगतच्या एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 

गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या धनश्री शिंदे या चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा शोध घेतला जात होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची दोन पथके या कामी शोध घेत होती. 

पोलिसांच्या पथकाने आजूबाजूच्या 10 ते 12 गावात या चिमुकलीचा शोध घेतला होता मात्र अद्याप पर्यंतचा तपास लागत नव्हता. गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेली धनश्री शिंदे ही गावालगत असणाऱ्या एका विहिरीत मृत अवस्थेत आढळून आली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

12 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर ती घराकडे येत असताना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती कैद झाली होती. त्यानंतर पुन्हा ती इतरत्र कोणालाही दिसली नाही. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मात्र गावालगत असणाऱ्या एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. धनश्री चा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यातून नेमके काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow