बिग ब्रेकिंग | बारामतीत व्यवसायिकाच्या गाडीवर गोळीबार, दोन राऊंड झाडले
आय मिरर
बारामती एमआयडीसी परिसरातील शिवशंभोनगर येथे बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.अज्ञात हल्लेखोरांनी कोळेकर यांच्या घराजवळ येऊन गेट उघडत त्यांच्या गाडीच्या दिशेने दोन राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे.
गोळीबाराची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा झाली आहे.एका दुचाकी वरून तिघेजण राजन कोळेकर यांच्या घराजवळ आले आणि दुचाकीवरूनच त्यांनी राजन कोळेकर यांच्या वाहनावर फायरिंग केल्याचं या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे.बारामती तालुका पोलीस पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी राजन कोळेकर यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तींनी कॉल केला होता. या कॉलद्वारे त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराजवळ येत गाडीवर दोन राऊंड गोळीबार केला.
या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तपास सुरू केला असून, गोळीबार करणारे अज्ञात व्यक्ती कोण, त्यांचा उद्देश काय आणि खंडणीच्या धमकीशी या घटनेचा संबंध आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.
What's Your Reaction?