वडगाव निंबाळकर पोलिसांकडून चार महिन्यांपासून फरार असणाऱ्या पोक्सो मधील आरोपीला अटक

Nov 21, 2026 - 06:54
Nov 21, 2026 - 07:10
 0  124
वडगाव निंबाळकर पोलिसांकडून चार महिन्यांपासून फरार असणाऱ्या पोक्सो मधील आरोपीला अटक

आय मिरर

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी अमर चव्हाण गेल्या चार महिन्यांपासून वडगाव निंबाळकर पोलिसांना गुंगारा देत होता अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.त्याने फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याची माहिती ही पोलीस तपासात उघड झाली आहे.

वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी अमर सोमनाथ चव्हाण यांच्या विरोधात पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता. मात्र गेल्या चार महिन्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.18 नोव्हेंबर 2026 रोजी आरोपी गावात आल्याची गोपनीय माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ हालचाली करत सापळा रचला. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करत त्याला शिताफीने पकडण्यात यश मिळवले. तब्बल चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याची माहिती उघड झाली. याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 427/2026, bns कलम 303(2)अन्वये चोरीचा गुन्हा दाखल असून त्याच्याकडून टीव्हीएस कंपनीची TVS SPORT ही गाडी जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस शिपाई विकास येटाळे, पोलीस शिपाई भानुदास सरक, चालक हवालदार शेंडकर व चालक होमगार्ड संदीप कसबे यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow