दौंड नगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा...

Nov 8, 2025 - 13:16
Nov 8, 2025 - 13:28
 0  310
दौंड नगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा...

आय मिरर 

दौंड नगरपालिकेला सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ देण्यासाठी व केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दौंड नगरपालिकेचे रोखपाल ओंकार मेनसे व लेखापाल भाग्यश्री येळवे यांच्या विरोधात लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे दौंड नगरपरिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

दौंड नगरपालिकेला सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ देण्यासाठी व केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी या दोघांनी साधारणतः 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने 6 मार्च 2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, तक्रारी नंतर संबंधित विभागाने सदर तक्रारीबाबत शासकीय पंचा समक्ष पडताळणी केली असता या दोघांनी पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून दौंड पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तत्कालीन मुख्याधिकारी विजय कावळे यांच्या कार्यकाळातील ही दुसरी घटना समोर आली आहे.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, ला.प्र.वि. पुणे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, ला.प्र.वि. पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

 

लोकसेवक शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास 9823167154 व 9029030530 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन  शिरीष सरदेशपांडे, आणि अजीत पाटील यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow