मटण घ्यायचं होतं विक्रेत्याने लाईनीत थांबायला लावलं ! साहेबांना राग आला मग काय मटण विक्रेत्याची खैर नाय...

Dec 27, 2025 - 17:28
Dec 27, 2025 - 18:21
 0  2931
मटण घ्यायचं होतं विक्रेत्याने लाईनीत थांबायला लावलं ! साहेबांना राग आला मग काय मटण विक्रेत्याची खैर नाय...

आय मिरर

'लाईनमध्ये थांबायला वेळ नाही, मी मोठा आहे' अशी मग्रुरी दाखवणाऱ्या एकाने सहकाऱ्यांच्या मदतीने थेट मटन दुकानदाराचे अपहरण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बारामतीत तालुक्यात घडली आहे. 

आरोपींनी मटण विक्रेत्याला कोयता, बेल्ट व हातांनी बेदम मारहाण केली असून याप्रकरणी बारामती तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी ऋषी गावडे यास अटक केली असून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ज्ञानेश्वर भारत आटोळे (वय २७, रा.सावळ ता.बारामती) हे 'जय भवानी मटन शॉप' चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि.२१ डिसेंबर रोजी सुर्यनगरी येथील दुकानावर मटन खरेदी दरम्यान एका व्यक्तीने लाईनमध्ये उभे राहण्यास नकार देत 'गुगलवर माझं नाव शोध, मी मोठा ऑफिसर आहे' अशी दमदाटी केली. 

त्यावेळी वाद-विवाद झाला. वजनाचा काटा उचलून मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तो व्यक्ती मटन घेऊन निघून गेला. ऑनलाईन पेमेंटवरून त्याचे नाव 'स्वागत हनुमंत सोरटे' असे असल्याचे समोर आले.

या घटनेचा राग मनात धरून (दि.२५ डिसेंबर) रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर आटोळे हे दुकानातील कामगारासह बाहेर असताना, ऋषी गावडे याच्यासोबत नियोजन करून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट व क्रेटा गाड्यांमधून आलेल्या 5 व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने स्विफ्ट कारमध्ये बसवले असा तक्रारदाराच्या वतीने आरोप करण्यात आला आहे. 

जळोची गावाच्या दिशेने नेताना व्हिडीओ कॉलद्वारे पूर्वी दुकानावर वाद घातलेला व्यक्ती संपर्कात होता. 'मी सांगितले तसेच करा, मला बघू द्या यात किती दम आहे,' असे म्हणत त्याने मारहाणीचे आदेश दिल्याचा आरोप तक्रारदाराचा आहे.

कन्हेरी रोड व जळोची ब्रिज परिसरात नेऊन आरोपींनी कोयत्याचे मुठीने, बेल्टने व हातांनी ज्ञानेश्वर आटोळे यांना मारहाण केली. 'तुला जिवंत सोडणार नाही' अशी धमकी दिली.या दरम्यान पोलिस, फिर्यादीचे भाऊ व नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. 

घटनेनंतर ऋषी गावडे याने ही शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी किडनॅपिंग करून मारहाण करणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी ऋषी गावडे यास पोलिसांनी अटक केली असून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोलिस तपासात संकेत मुसळे, शितल बेंगारे राहणार पारवडी हे सुद्धा गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न होत आहे. इतर आरोपींबाबत तपास सुरू आहे. 

दरम्यान बारामती तालुका पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याबाबत दाखल गुन्ह्यात आरोपी श्रीराज अविनाश चव्हाण राहणार बारामती यास सुद्धा अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम युवराज पाटील कल्याण शिंगाडे पोलीस जवान सुरेंद्र वाघ मनोज पवार भारत खारतोडे दादा दराडे यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow