निमगांव केतकीतील जिल्हा परिषद शाळेत साजारा झाला "आजी-आजोबां"चा दिवस
आय मिरर
लहान मुलांना आजी-आजोबांचे महत्त्व समजावं आणि आजी आजोबांशी असलेले नाते अधिक दृढ व्हावं या उद्देशाने इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत भोसले वस्ती जिल्हा परिषद शाळेत आजी,आजोबा दिवस साजरा करण्यात आलाय.या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात आजी आजोबांनी उपस्थिती लावली होती.
भोसले वस्ती जिल्हा परिषद शाळा येथे आजी आजोबा दिवस मान्यवरांचे उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.यावेळी गेटवरच पुष्पवृष्टी करत आजी-आजोबांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे पाय धुऊन पूसून पुजा करत त्यांचे औक्षण करून आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमासाठी २०० हून अधिक आजी-आजोबा उपस्थित होते.
सद्याच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंब संस्था मोडकळीस आल्याचे किंवा विस्कळीत झाल्याचे दिसून येते. मोबाईल मुळे तर माणसे एकमेकांशी संवाद साधतचं नाहीत केवळ यांत्रिक चर्चा होतात.विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांना आजी आजोबा परके झाल्यासारखे वाटते. भविष्यात कुटुंब संस्था मजबूत होण्यासाठी आजी आजोबा यांचे महत्त्व मुलांना समजावून सांगणे काळाची गरज बनेल. आणि म्हणूनच की काय शासनाने शाळेत आजी – आजोबा दिवस साजरा करण्याबाबत परिपत्रक काढले आहे.
यावेळी आजी आजोबांच्या संगीत खुर्ची, उखाणे, फनी गेम,डान्स अशे विविध खेळ घेण्यात आले. आणि मान्यवरांच्या हस्ते नंबर आलेला आजी आजोबांना सन्मानित करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांविषयी मनोगत व्यक्त करत त्यांची मने जिंकली.
यावेळी निमगाव केतकी केंद्रप्रमुख संभाजी आजबे, उपसरपंच मधुकर भोसले, ग्रामपंचायत सदस्य अलका भोंग, मनीषा बारवकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभव जाधव, उपाध्यक्ष गणेश शिंदे,विक्रम जगाताप,बापू फुटाणे,निलकंठ भोंग,दत्ता मिसाळ ,नानासाहेब चांदणे त्याचप्रमाणे मुख्याध्यापक संजय म्हस्के , राजश्री कुदळे, प्रणिता शेंडे, समाधान भोंग, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?