इंदापूरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडली कौशल्य दौड स्पर्धा

Sep 17, 2023 - 19:06
Sep 17, 2023 - 19:07
 0  101
इंदापूरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडली कौशल्य दौड स्पर्धा

आय मिरर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रधानमंत्री दौड व पदवीदान कार्यक्रम पार पडलाय.250 विद्यार्थ्यी विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयएमसी आयटीआय इंदापूरचे बाळासाहेब सोनवणे तर प्रमुख पाहुणे भारत स्वाभिमान न्यास इंदापूरचे अध्यक्ष जयकुमार शिंदे यांसह मल्हारी घाडगे, रवींद्र परबत,हमीदभाई आत्तार, विक्रम पोद्दार, हरिश्चंद्र कवडे आदी उपस्थित होते. 

नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. स्टार्टप इंडिया सारख्या योजनेत सहभागी होऊन नवनवीन उद्योग सुरू करावेत तसेच उद्योग धंद्यामध्ये शॉर्ट अनालिसिसचे फार महत्त्व आहे तेही तुम्ही आत्मसात करा असे आवाहन बाळासाहेब सोनवणे यांनी केले.

जयकुमार शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये आरोग्याचे व योग प्राणायामाचे दैनंदिन जीवनामध्ये असलेले महत्त्व विशद केले, त्याचबरोबर उद्योग व्यवसायिकांच्या अंगी लागणारी जिद्द, चिकाटी, व प्रामाणिकपणा हे गुण आत्मसात करण्यासाठी योगप्रणायाम खूप महत्त्वाचा आहे, तसेच सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी तुम्ही दररोज योग प्राणायाम करणे गरजेचे आहे.त्यासाठी त्यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण दिले ते योगप्रणामामुळे सलग अठरा - अठरा तास काम करत आहेत त्यांचा आदर्श युवकांनी डोळ्यासमोर ठेवावा असे त्यांनी सांगितले.  

2023 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये प्रत्येक व्यवसायातून प्रथम आलेले प्रत्येकी तीन क्रमांक काढले त्यामध्ये पहिले तीन आलेल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकाचा सत्कार करण्यात आला तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या व प्रभारी प्राचार्य सूर्यकांत झणझणे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. परीक्षक म्हणून आदर्श शिक्षक धनाजी भोंग यांनी काम पाहिले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवास काळे, धर्मराज सोनटक्के, राजेंद्र मुटके ,तुकाराम कदम, दत्तात्रेय गावडे, संजय कुमठेकर , परेश किंकरे, विजयकुमार आतार, सुनील मोरे, सुधाकर दोंड, संभाजी माने ,दत्तात्रय देवकर ,राहुल मुटके, दीपक ननवरे ,अजय जाधव, बालाजी दानव, वैभव बारबोले यांनी परिश्रम घेतले. प्रस्ताविकेमध्ये प्रभारी प्राचार्य सूर्यकांत झणझणे यांनी संस्थेची प्रगती व मॅरेथॉन स्पर्धेचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन रंगराव एकल यांनी तर आभार अनिल सोनटक्के यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow