Indapur शाळेच्या पहिल्या दिवशी कदमवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

Jun 16, 2025 - 13:03
Jun 16, 2025 - 13:04
 0  291
Indapur शाळेच्या पहिल्या दिवशी कदमवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

आय मिरर 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती येथे आज विद्यार्थ्यांचे पुस्तके वह्या पेन्सिल पुष्पगुच्छ खाऊ आणि स्पोर्ट्स ड्रेस मुलांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती येथे शाळेतील सर्व मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तक, गणवेश, बूट सॉक्स आणि वह्या, पेन ,पेन्सिलचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी भगवान मोरे उपसरपंच गलांडवाडी नंबर एक, देविदास वीर, प्रशांत जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कदम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य कृष्णा कदम, स्वप्नाली कदम, स्वाती देवकर, कुसुम ननवरे आदी उपस्थित होते.

दरम्यान Iream India कडूनही संस्थापक शर्मिला गुंजाळ,किसन गुंजाळ आणि मयूर गुंजाळ यांच्यातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस देण्यात आले.

तर गलांडवाडी नंबर १ चे उपसरपंच भगवानराव मोरे यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती वरील सर्व मुलांना वही आणि पेन पेन्सिल चे वाटप करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक वसंत फलफले यांनी दिली.

शाळेचे मुख्याध्यापक वसंत फलफले यांनी प्रस्ताविक केले केले आणि शाळेच्या उपशिक्षिका सारिका भोंग यांनी सर्वांचे आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow