राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून गुंजवणी प्रकल्पाची पाहणी
आय मिरर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या उपस्थित पुरंदर मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजगड मधील गुंजवणी प्रकल्पाची पाहणी केलीय.
पुरंदरसाठीचा गुंजवणी प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दिले होते.त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आता पावले उचलायला सुरवात करण्यात आलीय.याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुंजवणी प्रकल्पाची पाहणी केलीय.
येत्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार गुंजवणी प्रकल्पासंदर्भात बैठक घेणार आहेत. दोन दिवसात गुंजवणी प्रकल्पाची घेतलेली माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पदाधिकारी सादर करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार दिलेला शब्द पाळणारा नेता असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
मागील तीन विधानसभा निवडणुकीमध्ये गुंजवणीच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवली गेली होती.आता अजित पवार यावेळेस गुंजवणीचा प्रश्न हातात घेऊन ही निवडणूक पुन्हा एकदा लढू पाहत आहेत.पुरंदरच्या जनतेला हा प्रकल्प पूर्ण करण्याचं आश्वासन देऊन विजय शिवतारे यांनी दोन वेळा तर आमदार संजय जगताप यांनी एक वेळा ही निवडणूक जिंकली.तर आता हा प्रश्न अजित पवार यांनी आपल्या हातात घेतल्याने हा प्रकल्प पूर्ण होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
What's Your Reaction?